मागील काही दिवसापासून शहरात व मोरबे पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण चांगले असून यंदाही गेल्यावर्षी प्रमाणे धरण भरण्याची शक्यता आहे. मोरबे धरण ९६.२३ टक्के भरले असून आता धरण १०० टक्के भरण्यासाठी फक्त ४०० मिमी.पावसाची आवश्यकता आहे. तर धरणात ऑगस्ट २०२३ पर्यंत पुरेल एवढा जलसाठा झालेला आहे.गेल्यावर्षी २९ सप्टेंबरला १०० टक्के धरण भरले होते.त्यामुळे गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही धरण भरणार असल्याचा विश्वास पालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे.

मोरबेच्या पाण्यावर जलसंपन्न शहर म्हणून नावलौकीक मिळालेले नवी मुंबई महापालिकेचे मोरबे धरण अद्याप ९६ टक्के भरले असून धरणात ऑगस्ट २०२३ पर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा झाला आहे.नवी मुंबई शहर व मोरबे पाणलोट क्षेत्रात यंदा संपूर्ण जून महिन्यात पाऊस पडला नाही. पावसाविना जून महिना कोरडाच गेला होता. त्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत मोरबे धरणाची पाणीपातळी ५ मीटर खाली गेला होती. मोरबे धरण परिसरात गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी पाऊस होत असल्यामुळे नवी मुंबई शहरावर पाणी कपातीचे संकट निर्माण झाले होते. परंतु जूनमधील पावसाने हात आखडता घेतला होता त्याची भर जुलै ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात भरून काढली आहे.

water bodies, Tadoba,
ताडोबातील वाघांना आवडे नैसर्गिक पाणवठे, रखरखत्या उन्हापासून बचावासाठी….
Chalisgaon, railway trains canceled,
चाळीसगावमधील कामामुळे तीन दिवस काही रेल्वे गाड्या रद्द
heavy traffic jam for two hours in dombivli
डोंबिवली दोन तासांपासून अभूतपूर्व वाहतूक कोंडीत; रविवारी खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना फटका
thane traffic
कल्याण: पत्रीपुलावर दोन तासांपासून वाहनांच्या रांगा

हेही वाचा : सिडकोच्या दुर्लक्षामुळे द्रोणागिरी ते पागोटे सागरी महामार्गावरील खड्ड्यांमध्ये वाढ

यंदा पावसाळ्यापूर्वी फक्त १५ ऑगस्ट २०२२पर्यत पुरेल एवढेच पाणी धरणात होते. धरण भरण्यासाठी जवळजवळ ३८०० ते ४००० मिमी. पावसाची आवश्यकता होती. नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारे मोरबे धरण गेल्यावर्षी दमदार पावसाने २९ सप्टेंबर २०२१ ला पूर्ण भरले होते. यंदा पावसाचे प्रमाण अनिश्चित होते .परंतू आतापर्यंतच्या झालेल्या पावसाची सरासरी पाहता मोरबे धरण यंदाही पूर्ण भरेल असे प्रशासनाचे मत आहे. मागील काही दिवसापासून पावसाचा जोर पुन्हा सुरु झाल्याने धरण पुढील काही दिवसातच भरेल असे मत मोरबे धरण प्रकल्प अभियंता वसंत पडघन यांनी सांगितले. मोरबे धरण परिसरात ऑक्टोबरपर्यंत पाऊस पडतो त्यामुळे नवी मुंबईकरांची पाणी चिंता मिटली आहे .

हेही वाचा : विचित्र अपघातात रिक्षा थेट चढली झाडावर ; केबल्स वेटोळ्यांची करामत

मोरबे पाणलोट क्षेत्रात मागील काही दिवसापासून पावसाचे प्रमाण वाढले धरण काही दिवसातच भरेल अशी खात्री आहे .- अरविंद शिंदे,कार्यकारी अभियंता,मोरबे प्रकल्प

आतापर्यंत धरणात झालेला पाऊस – ३२२४.२० मिमी.
धरणातील एकूण जलसाठा – ९६.२४%
शहरात कधीपर्यंत पाणीपुरवठा करता येईल- २२ ऑगस्ट २०२३