Government power Chief Minister gathering Mathadi workers Navi Mumbai ysh 95 | Loksatta

सरकार सत्तेसाठी नव्हे, सत्यासाठी!; नवी मुंबईतील माथाडी कामगारांच्या मेळाव्यात मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन

हे सरकार सर्वसामान्यांचे असून सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी आहे, लोकांनी शिवसेना-भाजपला बहुमत दिले होते.

सरकार सत्तेसाठी नव्हे, सत्यासाठी!; नवी मुंबईतील माथाडी कामगारांच्या मेळाव्यात मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन
नवी मुंबईत माथाडी कामगारांच्या मेळाव्याला रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच कामगारमंत्री सुरेश खाडे उपस्थित होते. माथाडींचे नेते नरेंद्र पाटील यांनी मान्यवरांचा सत्कार केला.

नवी मुंबई:  हे सरकार सर्वसामान्यांचे असून सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी आहे, लोकांनी शिवसेना-भाजपला बहुमत दिले होते. ज्यांच्या विरोधात लढलो त्यांच्याबरोबर सत्तेसाठी हातमिळवणी करण्यात आली, मात्र अडीच वर्षांपूर्वी झालेली ही चूक आम्ही दुरुस्त केली असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. अण्णासाहेब पाटील यांच्या ८९ व्या जयंतीनिमित्त नवी मुंबईत माथाडी कामगारांच्या मेळाव्यात ते बोलत होते. माथाडी कामगारांच्या घरांचा, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा तसेच वैद्यकीय सुविधांचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. माथाडी कामगार घरांसाठी १५० कोटी दिले, आणखीन २०० कोटी निधी दिला जाईल, असे आश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.

आता माझ्याबरोबर अनुभवी देवेंद्र फडणवीस आहेत. त्यामुळे राज्यात काही कमी पडणार नाही. माथाडी कामगारांच्या घरांना प्रोत्साहन देऊ, सिडको घरांसाठी मदत करू. दीड हजार लोकांच्या सरकारी नोकऱ्यांचा निर्णय घेतला. गेली अडीच वर्षे फाइल हलत नव्हती, मात्र आम्ही अनेक निर्णय घेतले. त्यामुळे आमचे सरकार देणारे आहे घेणारे नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. मराठा समाजाला न्याय देण्यासाठी उपसमिती स्थापन झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अपप्रवृत्तींवर कारवाई – फडणवीस

माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी माथाडीच्या नावावर वसुली करणाऱ्यांमुळे माथाडी संघटना अडचणीत येत आहे, अशी माहिती दिली यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, माथाडी कामगार संघटनांमध्ये घुसलेल्या अपप्रवृत्ती, त्याचा गैरफायदा घेणाऱ्या अशा वसुली सम्राटांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट केले. त्यांनी यावेळी सांगितले की २०१४ पासून २०१९ पर्यंत या पाच वर्षांच्या काळात माथाडी कामगारांचे विविध प्रश्न  सोडविल्याची माहिती दिली.

नरेंद्र पाटील यांच्याकडे जबाबदारी

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वर्गीय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्षपद पुन्हा नरेंद्र पाटील यांच्याकडे द्यावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. यावेळी  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या भाषणात अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष हे नरेंद्र पाटील असतील अशी घोषणा केली. महामंडळाच्या  माध्यमातून आतापर्यंत ५० हजार मराठा उद्योजक निर्माण झाले आहे. हे काम सातत्याने सुरू राहिले असते तर आणखीन अडीच लाख मराठा उद्योजक निर्माण झाले असते. बाळासाहेब ठाकरे यांनी नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारे व्हा असे सांगितले होते ते आज सत्यात उतरत आहे, असे मत मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
नवी मुंबई : संकलित कचऱ्यातून ६० फूट फ्लेमिंगो प्रतिकृती साकारली !

संबंधित बातम्या

चित्रा वाघ यांचा सुषमा अंधारेंवर हल्लाबोल, म्हणाल्या “असे कितीही आडवे आले तरी…”
खारघर वसाहतीच्या चतु:सीमेपर्यंत दारुबंदीचा निर्णय; पनवेल पालिका आयुक्तांचा मोठा निर्णय
जेएनपीटीतील रस्तारुंदीकरण वर्षभरात
कोस्टल जेट्टीचेही खासगीकरण ; केंद्र सरकारकडून आठवडाभरात मंजुरी मिळणार असल्याची जेएनपीटीची माहिती
दहीहंडीचा उत्साह सीवूड्स, सानपाडा, ऐरोलीसह विविध भागांत दहीहंडीचे आयोजन

व्हिडिओ

ताज्या बातम्या
Shraddha Murder Case: आफताब पूनावालावर तलवारीने हल्ल्याचा प्रयत्न झाल्यानंतर दिल्ली पोलिसांचा मोठा निर्णय
केळीचे खांब, फुलांनी सजला राणादा-पाठकबाईंच्या लग्नाचा मंडप, मेहंदी कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू
Video: पर्यटकांना वाघाला जवळून पाहण्याचा मोह नडला! वाघ अचानक उड्या मारत आला अन…
Video: जॅकलिन फर्नांडिसने सिद्धार्थ जाधवला दिल्या मराठीत शुभेच्छा, म्हणाली…
सुंबूल तौकीर ऑन स्क्रीन पती फहमान खानसह बांधणार लग्नगाठ? ‘बिग बॉस’मध्ये खुलासा करत म्हणाली…