सोसायटय़ांतही पालिकेची कामे

नगरसेवक निधी वापरण्यास पनवेल पालिका आयुक्तांकडून हिरवा कंदील

(संग्रहित छायाचित्र)

पनवेल शहर पालिका क्षेत्रात यापुढे नगरसेवक निधी वापरता येणार असून गृहनिर्माण सोसायटय़ांच्या अंतर्गत विकासकामे नगरसेवक निधीतून केली जाऊ शकतील याला आयुक्त गणेश देशमुख यांनी हिरवा कंदील बुधवारच्या सर्वसाधारण सभेत दिला आहे. यामुळे नगरसेवक निधीतून सोसायटय़ांचा विकास होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मागील दोन वर्षांपासून स्वत:च्या निधीतून मिळणारे कोणतेही काम न करू शकणाऱ्या पालिकेच्या सदस्यांना आता स्वत:च्या प्रभागात कामे करता येणार आहेत.

पालिकेत नगरसेवक म्हणून निवडणुकीत विजय झाले मात्र सिडको वसाहतींमधील नगरसेवकांना नगरसेवक निधी वापरता येत नव्हता. सदस्यांच्या वतीने प्रत्येक सर्वसाधारण सभेत याविषयी खंत व्यक्त केली जात होती. खारघर येथील नीलेश बाविस्कर यांनी सनदशीर मार्गाने सिडको मंडळाकडे एका सोसायटीमध्ये काम करण्याची परवानगी मिळविल्यावर या सर्व कायदेशीर अडकलेला गुंता संपला. सिडको मंडळाकडून मिळालेल्या ना हरकत दाखल्यावर बाविस्कर यांनी पहिले काम केल्याचा लाभ इतर सदस्यांना मिळाला आहे. ४०० कोटी रुपयांची उलाढाल असल्याने सदस्यांना प्रत्येकी २५ लाख रुपयांची विकासकामे करण्याची संधी मिळण्याची मागणी सदस्य बावीस्कर यांनी बुधवारी सर्वसाधारण सभेत केली. आयुक्त गणेश देशमुख यांनी ही मागणी फेटाळत मागील आर्थिक वर्षी न वापरलेला निधी या वर्षी वापरण्याची तरतूद ठेवल्याने सुमारे दहा लाख रुपयांपर्यंत सिडको हद्दीत राहणारे नगरसेवक विकासकामे करू शकणार आहेत. सोसायटय़ांना रंग देणे, पेव्हरब्लॉक बसविणे, सभामंडप बांधणे, नाले दुरुस्त करणे ही कामे करता येणार आहेत.

निधीची ‘कृपा’

गृहनिर्माण सोसायटय़ांमधील जे प्रतिनिधी निवडणुकीत नगरसेवकांची मतांची निष्ठा दाखवतील त्यांच्यावरच नगरसेवक निधीच्या विकासकामांची कृपा होण्याची भिती आहे. नगरसेवक निधीत ‘इ निविदा प्रक्रिया टाळण्यासाठी दोन लाख रुपयांच्या आतील कामे करण्याचे प्रयोजन आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नवी मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Green signal from panvel municipal commissioner to use corporators funds abn

ताज्या बातम्या