scorecardresearch

उरण मध्ये जोरदार पावसाची हजेरी

उरणच्या बाजारात आलेल्या पावसामुळे ग्राहकांची व नागरिकांची व शाळेतून परतणाऱ्या विद्यार्थ्यांची एकच तारांबळ उडाली.

उरण मध्ये जोरदार पावसाची हजेरी
उरण मध्ये जोरदार पावसाची हजेरी

उरण : गुरुवारी साडे अकरा वाजता उरण शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे उरणच्या बाजारात आलेल्या ग्राहकांची व नागरिकांची व शाळेतून परतणाऱ्या विद्यार्थ्यांची एकच तारांबळ उडाली. गुरुवारी सकाळी कडक ऊन पडलं होतं. त्यानंतर वातावरणात बदल होऊन आलेल्या पावसामुळे गारवा निर्माण झाला.

उरणच्या नागाव,केगाव भागातसह इतर विभागात ही पावसाने काळोख केला होता. यावेळी उरण शहरात ही पावसाचे वातावरण निर्माण झाले होते. ढगांनी आभाळात काळोख केला होता. केगाव परिसरात जोरदार कोसळत असलेल्या पावसामुळे येथील ओढे,नाले भरून वाहू लागले आहेत. तर उरण शहरात आलेल्या पावसामुळे शाळेतुन घरी जाणाऱ्या व शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना ही या पावसाचा फटका बसला आहे.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या