उरण : गुरुवारी साडे अकरा वाजता उरण शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे उरणच्या बाजारात आलेल्या ग्राहकांची व नागरिकांची व शाळेतून परतणाऱ्या विद्यार्थ्यांची एकच तारांबळ उडाली. गुरुवारी सकाळी कडक ऊन पडलं होतं. त्यानंतर वातावरणात बदल होऊन आलेल्या पावसामुळे गारवा निर्माण झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उरणच्या नागाव,केगाव भागातसह इतर विभागात ही पावसाने काळोख केला होता. यावेळी उरण शहरात ही पावसाचे वातावरण निर्माण झाले होते. ढगांनी आभाळात काळोख केला होता. केगाव परिसरात जोरदार कोसळत असलेल्या पावसामुळे येथील ओढे,नाले भरून वाहू लागले आहेत. तर उरण शहरात आलेल्या पावसामुळे शाळेतुन घरी जाणाऱ्या व शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना ही या पावसाचा फटका बसला आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heavy rain in market area uran tmb 01
First published on: 06-10-2022 at 13:35 IST