सायंकाळी सातपर्यंत ५३.४२ मिमी पाऊस; ऐरोलीमध्ये सर्वाधिक नोंद

नवी मुंबई : ‘गुलाब’ चक्रीवादळ निवळले असून, त्याचे कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर झाल्याने हवामान विभागाने मुसळधार ते अतिवृष्टीचा धोका वर्तवला होता. त्यानुसार मंगळवार दुपारनंतर नवी मुंबईत पावसाचा जोर वाढला असून मुसळधार पाऊस पडत आहे. साडेपाच वाजेपर्यंत तीन तासांत ४४.८० मिमी तर सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत ५३.४२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

मंगळवारी दुपारी दोन वाजेपर्यंत शहरातील जनजीवन सुरळीत सुरू होते. मात्र त्यानंतर पाऊस सुरू झाला. मात्र पावसाचा जोर अधिक होता त्यामुळे काही प्रमाणात जनजीवन विसकळीत झाले.

शहरात तीन तासांतच म्हणजे साडेपाच वाजेपर्यंत सरासरी ४४.५० मिमी पावसांची नोंद झाली आहे. तर रात्री उशिरा हाती आलेल्या नोंदीनुसार सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत ५३.४२ मिमी पाऊस झालाा आहे. त्यानंतरही पावसाचा जोर कायम होता.

दुसरीकडे मंगळवारी दुपारी ४.३५ मिनिटांनी मोरबे धरणाचे दरवाजे उघडले आहेत. त्यातून ११२३ क्यूसेस पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.

सायंकाळी ७.३० पर्यंतचा पाऊस

  • बेलापूर :  ३६.४०
  • नेरुळ : ४४.७०
  • वाशी :  ४६.००
  • कोपरखैरणे : ४३.७०
  •   ऐरोली :  ९६.३०
  •   सरासरी पाऊस :५३.४२ मिमी.