नवी मुंबई : मराठा आरक्षण मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा मुंबईत धडकणार असून २५ तारखेला लाखोंच्या संख्येने येणाऱ्या मोर्चेकऱ्याचा  मुक्काम नवी मुंबईत होणार आहे. त्या अनुषंगाने हजारो वाहने येणार असून नवी मुंबई वाहतूक पोलीस विभागाने कंबर कसली आहे, 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठा आरक्षण मागणीसाठी  मनोज जरांगे पाटील यांनी २० जानेवारीपासून  जालना ते मुंबई अशी पायी पदयात्रा सुरु केली आहे. त्यांच्या पदयात्रेबरोबर मोठया प्रमाणात दुचाकी व चारचाकी वाहनांचा ताफा आहे. ही पदयात्रा २५ तारखेला  नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात येणार असून पदयात्रेचा एका दिवसाचा मुक्काम देखील नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात असणार आहे.

हेही वाचा >>> नवी मुंबई : महापालिका शिक्षकांवर सर्वेक्षण कामांचा भार!

पदयात्रेसोबत मार्गस्थ असलेली वाहने तसेच नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील अंतर्गत रस्त्यांवरील वाहनांच्या वाहतुकीचे व पार्किंगचे नियोजन योग्य प्रकारे नियोजनासाठी वाहतूक पोलीस सज्ज झाले आहेत.   २५  जानेवारी रात्री  ००:०१ ते २६ जानेवारी रात्री १२ वाजेपर्यंत  नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत सर्व प्रकारच्या अवजड, मालवाहतुक करणा-या वाहनांना शहराचे सर्व मार्गावरुन मार्गस्थ होण्यास, प्रवेश करण्यास आणि वाहने उभी  करण्यास पुर्णतः बंदी घालण्यात आली आहे. यातून  जीवनावश्यक वाहने, पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, पदयात्रे सोबत असलेली वाहने, प्रवासी वाहतूक करणा-या सर्व प्रकारच्या बसेस व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागु होणार नाही, असे परिपत्रक वाहतूक विभागाने काढले आहे. 

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heavy vehicles ban in navi mumbai ahead of maratha kranti morcha zws
First published on: 24-01-2024 at 13:42 IST