उरण शहराचे प्रवेशद्वार असलेल्या चारफाट्याचे सुशोभीकरण करून या परिसरात लावण्यात आलेला हायमास्टचा दिवा बंद पडल्याने चारफाट्यावर पुन्हा एकदा अंधार पसरला आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवासी व उरणमधील नागरिकांना अंधारातूनच मार्ग काढावा लागत आहे.

हेही वाचा- पनवेल : तळोजा येथे एनएमएमटीच्या बसला आग; सुदैवाने जिवितहानी नाही

उरण शहरातून करंजा, ओएनजीसी, द्रोणागिरी, मुंबई,पनवेल आदी परिसरातून येणारी वाहने व प्रवासी उरणच्या चारफाट्याच्या मार्गातून येतात. येथील अरुंद व नादुरुस्त रस्त्यामुळे होणारी वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत होती. त्यामुळे चारफाटा हे उरणमधील कोंडीचे ठिकाण बनले होते. सुट्टीच्या दिवशी तर पिरवाडी समुद्र किनाऱ्यावर ये-जा करणाऱ्या पर्यटकांना या कोंडीचा सामना करावा लागत होता. या कोंडीतून नागरिकांची सुटका करण्यासाठी सिडकोने पुढाकार घेत प्रथम येथील झोपडपट्टी हटविली. त्यानंतर येथrल चौकाचे सुशोभीकरण करण्याचा प्रस्ताव तयार केला. त्यासाठी ओएनजीसी कडून निधीची मागणी केली होती. मात्र, पाच वर्षे होऊन ही हा निधी न मिळाल्याने सिडकोने स्वतःच येथील रस्त्याचे रुंदीकरण केले. त्यामुळे चौकातील कोंडीपासून उरणच्या नागरिकांची सुटका होण्यास मदत झाली.

हेही वाच- नवी मुंबईतील बेकायदा बांधकामे; जबाबदार व्यक्तींवर कारवाई आवश्यक : उच्च न्यायालय

चौकाच्या सुशोभीकरणाचा भाग म्हणून हायमास्टचा दिवा ही बसविण्यात आला होता. त्यामुळे संपूर्ण परिसर उजळून गेला होता. मात्र सध्या हा दिवा बंद असल्याने पुन्हा एकदा उरणमधील नागरिकांना अंधारातूनच प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे हा हायमास्ट चा दिवा पुन्हा एकदा सुरू करण्याची मागणी नागरिक व प्रवाशांनी केली आहे.

Story img Loader