लस लाभार्थीचा घरोघरी शोध

करोना प्रादुर्भाव नियंत्रणात आल्याने नागरिकांची भीती कमी झाल्याने लसीकरणास टाळाटाळ सुरू आहे.

नवी मुंबईत ‘हर घर दस्तक’ तर पनवेलमध्ये जनजागृतीसाठी सहा पथके

नवी मुंबई : करोना प्रादुर्भाव नियंत्रणात आल्याने नागरिकांची भीती कमी झाल्याने लसीकरणास टाळाटाळ सुरू आहे. त्यामुळे लस लाभार्थीचा शोध पालिका प्रशासनाने सुरू केला आहे. केंद्रावर लसीकरणास येत नसल्याने लाभार्थीच्या घराजवळ लसीकरणासाठी हाती घेतलेल्या ‘हर घर दस्तक’ योजनेअंतर्गत आतापर्यंत १७ हजार जणांचे तर सहा आरोग्य केंद्रांवर प्रत्येकी एक हजारांपेक्षा अधिक जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.

नवी मुंबईत ११ लाख लसपात्र नागरिक असून त्यांचे पहिल्या मात्रेचे लसीकरण पूर्ण झाले आहे. मात्र दुसऱ्या मात्रेचे लसीकरण आतापर्यंत ६५ टक्केच झाले आहे. पालिकेकडे लस शिल्लक आहे. लाभार्थी लस घेण्यास टाळाटाळ करीत आहेत. पहिल्या मात्रेचा लसीकरण कालावधी संपल्यानंतर लसीकरण केंद्रांवर जात दुसरी लसमात्रा घेणे अपेक्षित आहे. मात्र तसे होत नाही. त्यामुळे पालिका प्रशासनाने आशा लाभार्थीचा शोध सुरू केला आहे.

पालिकेने ‘हर घर दस्तक’ अभियानात शहरात घरापर्यंत जाऊन एकूण १७०६९ लसमात्रांचे लसीकरण करण्यात आले आहे. तर शहरातील २३ नागरीक आरोग्य केंद्रापैकी ६ आरोग्य केंद्रावर १ हजारांपेक्षा अधिक लसमात्रांचे लसीकरण करण्यात आले आहे.

या शिवाय महापालिकेची चार प्रमुख रुग्णालये, वाशी ईएसआयएस रुग्णालय येथील जम्बो लसीकरण केंद्र, २३ नागरी आरोग्य केंद्रे, मॉमध्ये ‘ड्राईव्ह इन लसीकरण’, एपीएमसीत बाजार आवर, जुईनगर रेल्वे कॉलनी  आदी ठिकाणीही नियमित लसीकरण सुरू आहे. याशिवाय १० एनएमएमटी बस रुग्णवाहिकांद्वारेही लसीकरण करण्यात येत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नवी मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Home vaccine beneficiaries ysh

Next Story
उरणमध्ये कामगारांचा मोर्चा
ताज्या बातम्या