नवी मुंबई : तृतीय पंथियांनी आयोजित केलेल्या हळदी कुंकू समारंभाला भरघोस प्रतिसाद

हिना शेख यांनी स्वतः पुढाकार घेत रविवारी भव्य हळदी कुंकू समारंभ आयोजित करीत माणुसकीचे वाण लुटले, अशी चर्चा परिसरात होत आहे.

Haldi Kunku Transgender navi mumbai
तृतीय पंथियांनी आयोजित केलेल्या हळदी कुंकू समारंभाला भरघोस प्रतिसाद (image – loksatta team/graphics)

नवी मुंबईत तृतीयपंथीय समाजाने हळदी कुंकू समारंभ आयोजित करत ‘हम भी कम नही’ याची प्रचिती दिली. यात सामान्य महिलांचा प्रतिसाद वाखाणण्याजोगा होता.

तृतीयपंथी म्हटले की बहुतांश व्यक्तींसमोर एक विशिष्ठ प्रतिमा उभी राहते. मात्र ते सुद्धा आपल्या सारखेच हाडामासाची माणसेच आहेत. नवी मुंबईतही तृतीय पंथीय समाजाची काही ठिकाणे असून त्या पैकीच हनुमान नगर महापे येथेही त्यांची वस्ती आहे. तृतीय पंथीय लोकांनाही अन्य समाजातील लोकाप्रमाणेच आमच्याकडे पहिले जावे ही भावना असते. अशातून अनेक तृतीयपंथी स्वत: पुढाकार घेतात. अशा पैकीच एक आहे हिना शेख. हिना शेख यांनी स्वतः पुढाकार घेत रविवारी भव्य हळदी कुंकू समारंभ आयोजित करीत माणुसकीचे वाण लुटले, अशी चर्चा परिसरात होत आहे.

हेही वाचा – नवी मुंबई : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणारा जेरबंद

हळदीकुंकू म्हणजे महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय. एके काळी महिला समाजात फारशा मिसळत नसत, त्यावेळी त्यांच्या विचारांची देवान घेवाण होण्याच्या उद्देशाने हळदी कुंकू सारख्या प्रथा पडल्या. हाच धागा पकडून हीना शेख यांनी महापे येथे सार्वजनिक हळदी कुंकू समारंभाचे आयोजन केले होते. विशेष म्हणजे, या समारंभाला सामान्य घरातील अनेक महिलांनी उपस्थित लावली होती. तसेच, मनसे विभाग अध्यक्ष नागेश लिंगायत, युवा नेते अ‍ॅड.अमोल उघाडे, समाजसेवक निशांत पाटील, दिपेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा – नवी मुंबईतील सीसीटीव्ही केबल उपक्रम धिम्या गतीने रखडला; उखडलेले पदपथ अनेक दिवसांपासून तसेच पडून 

आम्हीही माणूसच आहोत आम्हालाही भावना आहेत. आम्हालाही वाटते इतरांना जी वागणूक मिळते ती आम्हाला मिळावी. त्याचाच एक प्रयत्न म्हणून हळदीकुंकू समारंभ आयोजित केला होता. त्याला समाजातील विविध स्तरात काम करणारे, तसेच महिलांनीही उपस्थिती दर्शिवली होती, असे हीना शेख (आयोजक) यांनी सांगिकले

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-01-2023 at 15:13 IST
Next Story
नवी मुंबईतील सीसीटीव्ही केबल उपक्रम धिम्या गतीने रखडला; उखडलेले पदपथ अनेक दिवसांपासून तसेच पडून 
Exit mobile version