नवी मुंबई : मानवी कवटी आढळल्याने उडाली एकच खळबळ | human skull mahape company area cctv dog rabale midc police navi mumbai | Loksatta

नवी मुंबई : मानवी कवटी आढळल्याने उडाली एकच खळबळ

कवटी एका भटक्या कुत्र्याने  आणली असल्याचे सीसीटीव्ही फुटेज मधून उघड झाले आहे.

नवी मुंबई : मानवी कवटी आढळल्याने उडाली एकच खळबळ
प्रतिनिधिक छायाचित्र

नवी मुंबई : महापे येथे एका कंपनी आवारात एक मानवी कवटी आढळल्याने खळबळ उडाली आहे. ही कवटी एका भटक्या कुत्र्याने  आणली असल्याचे सीसीटीव्ही फुटेज मधून उघड झाले आहे. कवटी जळालेल्या अवस्थेत असल्याने ओळख पटलेली नाही . महापे येथील एका कंपनी आवारात एक जळालेल्या अवस्थेत मानवी कवटी आढळून आली. या बाबत रबाळे एमआयडीसी पोलिसांना महिती मिळताच या ठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर पाटील पथकासह उपस्थित झाले. ही कवटी ताब्यात घेत वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आली आहे. कवटी ही महिलेची आहे की पुरुषाची हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता तीन दिवसांपूर्वी एका भटक्या कुत्र्याने आणून टाकल्याचे समोर आले. सध्या या घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. कवटी कुणाची आहे , हत्येचे प्रकरण। आहे की कुत्र्याने स्मशानातून आणली आहे, याचा तपास सुरू आहे. वैद्यकीय तपासणी अहवाला नंतर तपासाची दिशा स्पष्ट होईल. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांनी दिली.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
सीबीएसई शाळेतील शिक्षकांची प्रतिक्षा कायम ; पालकांचा आंदोलनाचा ईशारा

संबंधित बातम्या

नवी मुंबई : प्रारूप विकास आराखडा मागे घेण्याची सिडकोची सूचना
नवी मुंबई : कोपरखैरणे ते वाशी झालेल्या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक वैतागले
उरण: नौदलाच्या तुणीर डोंगराला आग,अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल
नवी मुंबई: कोपरखैरणे भाजी मंडई वापरावीना ओस

व्हिडिओ

ताज्या बातम्या
Fifa World Cup 2022 : जपानचा स्पेनवर विजय, जर्मनी थेट स्पर्धेबाहेर
विवाह समुपदेशन: भांडणांत मुलांची मधस्थी नकोच नातेसंबंध,
पाथरीकरांची ‘श्रद्धा’ पण शासनाची ‘सबुरी’!; साईबाबा तीर्थक्षेत्र आराखडा तीन वर्षांपासून रखडला
रेल्वेमुळे तुळजापूर, उस्मानाबादच्या विकासाचा मार्ग मोकळा
स्मृतिभ्रंश आजार बरा करणारे औषध शोधण्यात यश ; वृद्धांना मोठा दिलासा