नवी मुंबई : पैशांची चणचण भागवण्यासाठी एका जोडप्याने घरफोडी करण्याचा मार्ग अवलंबला. मात्र पोलिसांनी केलेल्या तांत्रिक तपासात दोघांनी केलेल्या गुन्ह्याचा मागोवा काढण्यात पोलिसांना यश आले. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सोने, चांदी, मोबाईल असा २ लाख २२ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

श्रेयस जाधव आणि वैशाली जाधव असे या जोडप्याचे नाव आहे. श्रेयस हा मार्केटिंगची नौकरी करतो. तो अंबरनाथ येथे राहतो, तर वैशाली ही घणसोलीत राहते. समाजमाध्यमातून दोघांची ओळख झाली आणि पुढे लग्नही केले. काही दिवस चांगले गेले, मात्र नंतर पैशांची चणचण भासणे सुरू झाले. त्यातून दोघांनी मिळून गेल्या वर्षी घणसोली येथे एक घरफोडी केली होती.

हेही वाचा – नवी मुंबई : विना हेल्मेट प्रवास करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दणका, दोन दिवसांत ६० जणांवर आरटीओची कारवाई

घरफोडी करताना चोरट्यांनी काळजी घेतल्याने पोलिसांच्या हाती काहीही धागेदोरे लागत नव्हते. मात्र काही दिवसांपूर्वी तेथे घटनेवेळी वापरात येणाऱ्या मोबाईल क्रमांकाच्या शोधातून एक संशयित क्रमांक आढळून आला. त्याचा तपास केला असता तो श्रेयसचा असल्याचे समोर आले. त्यामुळे त्याला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली देत यात पत्नीची मदत होती, हेसुद्धा कबूल केले. त्यामुळे तिलाही अटक करण्यात आली. त्यांच्याकडून एक मोबाईल फोन, सोन्याची नाणी, चांदीच्या वस्तू असा २ लाख २२ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. विशेष म्हणजे, चौकशीत वैशाली ही एका पोलीस कर्मचाऱ्याची मुलगी असल्याची माहिती समोर आली आहे. 

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Husband and wife arrested in burglary case ssb
First published on: 07-06-2023 at 20:01 IST