पनवेल : सासू व सूनेचा वाद अगदी विकोपाला गेल्याच्या अनेक घटना आपण ऐकल्या व पाहिल्या असतील मात्र दोन दिवसांपूर्वी खांदेश्वर पोलीस ठाण्यात एका सूनेने केलेल्या फौजदारी तक्रारीत सासूच्या विकृतपणाचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. ही घटना मुंबई येथील चुनाभट्टी येथे घडली असून या सर्व प्रकारामध्ये भरडलेल्या पिडीत शिक्षिकेने ही तक्रार नोंदविली आहे. दोन वर्षांपूर्वी ३३ वर्षीय पिडीतेचा विवाह मुंबई शीव (चुनाभट्टी) येथे राहणाऱ्या ३८ वर्षीय तरुणासोबत झाला. सासू सासरे आणि पती यांच्यासोबत पिडीता राहत होती. पिडीतेने दिलेल्या तक्रारीमध्ये पतीने इच्छेविरुद्ध अनैसर्गिक शारीरीक संबंध जबरदस्तीने ठेऊन त्रास दिला. मात्र त्याहून भयानक प्रकार सासूने केला. ५७ वर्षांच्या या सासूने या सर्व बलात्कार होतानाचे छायाचित्र काढले. हेही वाचा.नवी मुंबईत ७१७ कोटी मालमत्ता कर जमा, गतवर्षीपेक्षा ८३.६६ कोटी जास्त करवसुलीचा दावा पिडीतेने या धक्कादायक प्रकाराची तक्रार दिल्यावर तक्रार लिहून घेणारे पोलीसही अवाक झाले आहेत. वारंवार हा सर्व प्रकार सहन करुन पिडीता या कुटूंबासोबत मागील वर्षी एप्रिल महिन्यापर्यंत नांदली. मात्र हे सर्व असह्य झाल्यावर त्या पिडीतेने पोलीस ठाण्याचे दार ठोठावले. संबंधित प्रकार खांदेश्वर पोलीस ठाण्यात ३० मार्च रोजी नोंदविल्यानंतर तो मुंबई पोलीसांकडे वर्ग केला आहे.