पनवेल : मुलगा हवा होता, मात्र झाली मुलगी. ती मुलगी सुद्धा वर्णाने काळी असल्याने पती तीला हिणवू लागला. अशातच सासरकरांचा जाच सूरु झाला. दोन वर्षे हा सर्व त्रास सहन करणा-या पिडीतेने अखेर पोलीस ठाणे गाठले आणि मानसिक व शारीरीक त्रास देऊन हुंडा मागणा-यांविरोधात कायदेशीर पाऊल उचलले.

हेही वाचा : पहिली बाजू : पूर्वग्रह संघाचे की टीकाकारांचे?

या प्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात जाच करणा-या पतीसह सासरच्या सात जणांविरोधात गुन्हा नोंदविला. तळोजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक जितेंद्र सोनावणे यांनी या प्रकरणात सखोल चौकशी केली.कळंबोली वसाहतीमध्ये राहणारा लक्ष्मण सदाफुले याच्यासह त्याच्या पालक आणि नातेवाईकांविरोधात हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. श्वेता व लक्ष्मण यांचा विवाह झाल्यानंतर त्यांना एक बालिका आहे. श्वेता यांनी पोलीसांत दिलेल्या तक्रारीनूसार 2020 पासून ते मागील सप्टेंबर महिन्यापर्यंत हा त्रास त्यांनी सहन केल्याचे तक्रारी म्हटले आहे. मुलगी झाली म्हणून हिणविणा-या लक्ष्मणने श्वेताला घराबाहेर काढले.

हेही वाचा : नवी मुंबई : बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी एकाला अटक

मोटार खरेदी करण्यासाठी 10 लाख रुपयांची मागणी केली, ही रक्कम दिली नाही तर मुलीला ठार मारण्याची धमकी दिल्याचे पिडीतेने पोलीसांत दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. या पिडीतेने 60 वर्षाचे सासरे, 55 वर्षांची सासू31 वर्षांचा दिर, 26 वर्षांची जाऊ, नणंद व इतर सासरच्या नातेवाईकांनी वेळोवेळी जाच केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तळोजा पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.