ट्रान्स हार्बर मार्गावरील ऐरोली, रबाले, घणसोली, कोपरखरणे, तुभ्रे, सानपाडा आदि रेल्वे स्थानकांत अधिकृत उपहारगृह नसल्याने त्याची जागा बेकायदा फेरीवाल्यांनी घेतली आहे. भेळ विक्रेते, पॉपकान विकणाऱ्यांनी रेल्वे स्टेशनवर मोक्यांच्या ठिकाणी आपले बस्तान मांडल्याने चाकरमान्यांना बसण्यासाठी कधी कधी जागा मिळत नाही. त्यामुळे  चाकरमान्यांना यांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यांसदर्भात प्रवांशानी तक्रार करुनही रेल्वे प्रशासन व पोलिस बेकायदेशीरपणे आपले बस्तान मांडणाऱ्या विक्रत्याकडे दुर्लक्ष करीत आहे.

नवी मुंबईमध्ये सिडकोच्या माध्यमातून भव्य असे रेल्वे स्टेशन उभारण्यात आली असून रेल्वे स्टेशनच्या बाहेर अधिकृत जागा देखील देण्यात आली आहे. पंरतु रेल्वे प्रशासनाच्या व रेल्वे प्रवाशांच्या दुर्लक्षामुळे प्लॅटफॉर्मवरच विक्रेत्याने आपले बस्तान मांडले असून रेल्वे स्टेशनवर विक्रेत्यांची संख्या दिवसगणिक वाढत चालली आहे. मात्र रेल्वे प्लॅफॉर्मवर सकाळपासून रात्रीपर्यत व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्याकडे कोणीच लक्ष देत नसून रेल्वेच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ही अंत्यत घातक गोष्ट आहे. विशेष म्हणजे बेकायदेशीर विक्रेत्यांचे ठेकेदार परप्रांतीय असून तरुणांना कामावर ठेवतात. त्याच्याकडून भेळ, काकडी, मोसंबी, पॉपकान आदि विक्रीचे व्यवसाय करुन घेतात. पण अनाधिकृतपणे ठेका चालवणाऱ्या या विक्रेत्यावर कोणीच कारवाई का करत नाही. असा प्रष्टद्धr(२२४)्ना उपस्थित होत आहे. यांसदर्भात नागरिक स्टेशनमास्तर कडे तक्रार करण्यास गेले असता त्यांना आरपीएफकडे तक्रार करण्याचे उत्तर देऊन जवाबदारी झटकून टाकतात . पण रेल्वे स्टेशनवर खाजगी सेक्युरिटी असून आरपीएफ चे जवानच उपस्थित नसतात.  त्यामुळे कारवाई कोणी करावी असा संतप्त प्रष्टद्धr(२२४)्ना चाकरमानी विचारत असून त्यामुळे रेल्वे स्टेशनवर बेकायदेशीरपणे अवैधरित्या खाद्यपदार्थ विकणाऱ्या विक्रेत्यांचे फावले आहे.