शहरात बेकायदा शुभेच्छा फलकांचे पेव

दिवाळी सणानिमित्ताने शहरातील चौकांचे फलकबाजीमुळे विद्रूपीकरण झाल्याचे दिसत आहे.

नवी मुंबई : एकीकडे नागरिकांनाकरोना नियमांचा विसर  पडल्याचे दिसत असताना राजकीय पक्षांकडून राजकीय फलकबाजीला ऊत आल्याचे दिसत आहे. सर्व मोक्याच्या ठिकाणी बेकायदा शुभेच्छा फलक झळकले आहेत. असे असताना पालिका प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

दिवाळी सणानिमित्ताने शहरातील चौकांचे फलकबाजीमुळे विद्रूपीकरण झाल्याचे दिसत आहे. जाहिरात धोरणानुसार शहरातील काही मोजक्या जागा निश्चित केल्या आहेत. असे असताना जिथे जागा मिळेल तिथे शुभेच्छा फलक झळकताना दिसत आहेत. करोनामुळे लांबणीवर पडलेली नवी मुंबई महापालिकेची निवडणूक आगामी काळात होत असल्याने हा शुभेच्छांचा वर्षांव होत आहे. मात्र यामुळे शहराचे विद्रूपीकरण होत आहे. महापालिका प्रशासनाने स्वछ भारत अभियानाअंतर्गत शहरातील मोक्याच्या जागा सुशोभित करण्यावर करोडो रुपये खर्च केले आहेत. मात्र या शुभेच्छा फलकांनी काही ठिकाणी त्या जागाही दिसत नसल्याचे चित्र आहे.  विभाग कार्यालय स्तरावर तसेच पालिका मुख्यालयातून परवानगी घेतल्याशिवाय फलक लावता येत नाहीत. तसेच अधिकृत फलकावर पालिकेच्या परवानगी प्रत किंवा परवानगी क्रमांक प्रसिद्ध करणे आवश्यक असते. परंतु हा नियम डावलल्याचे दिसत आहे. त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत असून प्रशासनाने कारवाई करण्याची मागणी होत आहे.

एपीएमसीत करोनाला आमंत्रण

करोनाच्या दोन्ही लाटेत शहरातील गर्दीचे ठिकाण असलेल्या ‘एपीएमसी’तील बाजारपेठा या संसर्गाचे माध्यम बनल्या होत्या. आता दिवाळीमुळे घाऊक खरेदीसाठी या बाजारात मोठया प्रमाणात गर्दी होत आहे. मात्र मुखपट्टी न लावता हजारोच्या संख्येने ग्राहक खरेदी करीत असून करोना संर्सगाला निमंत्रण देत आहेत.

निश्चित केलेल्या जागांवर तेही पालिकेच्या पूर्व  परवानगीने फलक लावणे आवश्यक आहे. बेकायदा फलकांवर अतिक्रमण विभागाला कारवाई करण्याचे आदेश दिले जातील.

श्रीराम पवार, जाहीरात व परवाना उपायुक्त, महापालिका

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नवी मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Illegal hoardings of political leaders wishing diwali greetings in navi mumbai zws

Next Story
‘एपीएमसी’च्या कचऱ्यापासून गॅस निर्मिती?
ताज्या बातम्या