scorecardresearch

सेवा रस्त्यावर बेकायदा वाहनतळ ;जेएनपीटी ते पळस्पे महामार्गावरील प्रकार, वाहतुकीस अडथळा

जेएनपीटी ते पळस्पे हा ३४८ राष्ट्रीय महामार्ग सध्या सहापदरी झाला असून या मार्गावरील गावातील नागरिकांना सुरक्षित प्रवास करता यावा याकरिता सेवा (सव्हिर्स) रस्ता तयार करण्यात आले आहेत.

उरण : जेएनपीटी ते पळस्पे हा ३४८ राष्ट्रीय महामार्ग सध्या सहापदरी झाला असून या मार्गावरील गावातील नागरिकांना सुरक्षित प्रवास करता यावा याकरिता सेवा (सव्हिर्स) रस्ता तयार करण्यात आले आहेत. मात्र यावर वाहतुकीऐवजी बंदरातील जड वाहनांनी ताबा घेतला आहे. या सेवा मार्गाचे वाहनतळ झाले आहे.
रस्त्यांचे रुंदीकरण होऊन सेवा मार्ग अस्तित्वात आल मात्र यावरून नागरिकांना सुरक्षित प्रवास करता येत नसल्यान पुन्हा एकदा अपघातांवर टांगती तलवार कायम असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
बंदरातील कंटेनर हातळणीत दिवसेंदिवस वाढ होत असून १९८९ ला जेएनपीटी बंदराची निर्मिती झाल्यानंतर वर्षांकाठी बंदरातून होणारी १ लाख कंटेनर वाहनांची हातळणी सध्या ५६ लाखांवर पोहचली आहे. बंदराच्या निर्मितीनंतर ३३ वर्षांत या मागार्वरील वाढत्या कंटेनर वाहनांमुळे दरवर्षी या मार्गावरील शेजारी गावातील नागिरकांना अपघाताला सामोरे जावे लागले आहे. यामध्ये धुतूम गावात धोका जास्त आहे.
रस्त्यांची दुरुस्ती व रुंदीकरणाच्या तसेच गावांसाठी स्वतंत्र मार्गिका (सेवा मार्ग) तयार करण्याच्या मागणीसाठी येथील नागरिकांनी अनेक आंदोलनेही केली होती. त्यानंतर जेएनपीटी व भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून या मार्गाच्या रूंदीकरणासाठी सुमारे ३ हजार कोटी रुपयांचा खर्च करून जेएनपीटी ते पळस्पे व जेएनपीटी ते बेलापूर असे दोन राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण करण्यात आले आहे. त्याचनुसार या दोन्ही राष्ट्रीय महामार्गावर सेवा मार्गही तयार करण्यात आलेले आहेत.
चार किलोमीटपर्यंत रांगा सध्या जेएनपीटीशेजारील पागोटे, धुतूम, चिर्ले ते गव्हाण दरम्यानच्या सेवामार्गावरर कंटेनर वाहनांनी ताबा घेतला असून या मार्गावर कंटेनर वाहनांच्या तीन ते चार किलोमीटरच्या रांगा लागलेल्या असतात. वाहतूक विभागाकडून मुख्य मार्गावर वाहन उभे केल्यास कारवाई केली जाते. मात्र सेवामार्गावरील वाहनांवर कोणतीही कारवाई केली जात नाही. त्यामुळे हा मार्ग नागिरकांसाठी की पार्किंगसाठी केला आहे असा सवाल ग्रामस्थ करीत आहेत.
सेवामार्गावरर वाहने उभी राहत असल्यास त्याची खात्री करून अशा वाहनांवर कारवाई करण्यात येईल.-पुरुषोत्तम कराड, उपायुक्त, वाहतून विभाग, नवी मुंबई

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Illegal parking service road jnpt palaspe highway obstruction traffic national highway amy

ताज्या बातम्या