नवी मुंबई: अल्पवयीन मुलांचे घरातून गुपचूप निघून  जाण्याचे प्रमाणात वाढ होत असून कोपरखैरणेत दोन दिवसात चार जणांच्या बाबतीत हि घटना घडली आहे. या बाबत कोपरखैरणे पोलीस ठाण्यात या बाबत अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अल्पवयीन मुला मुलींचे घरातून निघून जाण्याचे प्रमाण वाढले असून ते अल्पवयीन असल्याने अपहरण गुन्हा नोंद करण्यात येतात. कुटुंबातील विसंवाद असे याला पोलीस कारण देत असून हा एक गंभीर प्रश्न बनत चालला आहे. कोपरखैरणे  सेक्टर १२ येथे राहणारे वकील अहेमद शेख हे रद्दीचा व्यवसाय करतात. त्यांचा तौहिक हा मुलगा असून ७ वीत शिकत आहे. हा अकरा वर्षीय मुलगा आई घरकाम करीत असताना दोन मिनिटात बाहेर जाऊन येतो म्हणाला मात्र अद्याप परतला नाही. त्याची सर्वत्र शोधाशोध केल्यावर शेवटी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी वाचा- नवी मुंबई महानगरपालिकेच्या सीबीएसई शाळांतील नर्सरीच्या वर्गाच्या प्रवेशासाठी पालकांच्या उड्या

दुसऱ्या प्रकरणात संतोष लोकरे यांची मुलगी बारावीला असून सध्या १२वीची परीक्षा सुरु आहे, २२ तारखेला ती परीक्षेला म्हणून गेली . त्याच दिवशी दुपारी साडे बाराच्या सुमारास तिच्या महाविद्यालयातून पालकांना ती  परीक्षेला न आल्याची माहिती दिली गेली. तिचा शोध घेऊन ती आढळून न आल्याने पोलीस ठाण्यात तिच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिसऱ्या घटनेत बिर्याणी हाऊस चालवणारे हजमत अली मन्सुरी यांचा १३ वर्षीय मोहम्मद नावाचा मुलगा २० तारखेला घरातून निघून गेला. तो या पूर्वीही असाच निघून जातो व एक दोन दिवसात परत येतो. मात्र यावेळी परत न आल्याने शुक्रवारी पोलीस ठाण्यात त्याचे अपहरण झाले म्हणून गुन्हा नोंद करण्यात आला.

चौथ्या घटनेत सेक्टर १७ येथे राहणारे प्रमोद लाल यांचा मुलगा साहिल हा मित्रांच्या समवेत खेळण्यास जातो म्हणून तो गेला ते परत आलाच नाही. तो ज्या मित्रांच्या समवेत असतो व ज्या मैदानात नेहमी खेळतो अशा सर्व ठिकाणी त्याच्या पालकांनी  शोध घेतला मात्र तो आढळून न आल्याने शेवटी त्याच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या सर्व वेगवेगळ्या घटना असून दोन दिवसात या बाबत गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. त्यांचा शोध सुरु आहे अशी माहिती कोपरखैरणे पोलिसांनी दिली.  

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In koparkhairan 4 abductions in different cases in 2 days including a girl mrj
First published on: 24-03-2023 at 14:56 IST