Premium

दिवसा घरफोडी करणाऱ्या पाच सराईत आरोपींना सीबीडी पोलिसांनी केले गजाआड, चार गुन्ह्यांची उकल

सद्दाम हुसेन, जमालूद्दीन खान, रत्नेश कांबळे, निलेश लोंढे, गुड्डूराम सोनी असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

cbd police nabbed 5 thieves for house burglary
दिवसा घरफोडी करणाऱ्या पाच सराईत आरोपींना सीबीडी पोलिसांनी केले गजाआड, चार गुन्ह्यांची उकल (संग्रहित छायाचित्र)

नवी मुंबई : घरफोडी करणाऱ्या पाच आरोपींना सीबीडी पोलिसांनी अटक केली आहे. सीबीडी येथे आठ लाखांचा दरोडा टाकून गुजरातमध्ये पळून जाण्याच्या तयारीत असतानाच सीबीडी पोलिसांनी गुजरात सीमेवर त्यांना जेरबंद केले. त्यांच्या कडून ९ लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. सद्दाम हुसेन, जमालूद्दीन खान, रत्नेश कांबळे, निलेश लोंढे, गुड्डूराम सोनी असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपी हे दिवसा घरफोडी करीत असे. सीबीडी पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून चार गुन्ह्यांची उकल केली आहे. सीबीडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत २०६ ग्रॅम वजनांचे सोने व दहा हजार रुपये रोख रक्कम असा एकूण आठ लाख बत्तीस हजार रुपयांचा ऐवज चोरून घरफोडी केल्याची तक्रार सीबीडी पोलीस ठाण्यात प्राप्त झाली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : पनवेल पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे धडे

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In navi mumbai cbd police arrested 5 thieves who burglarized houses during the daylight css

First published on: 05-12-2023 at 20:05 IST

आजचा ई-पेपर : नवी मुंबई

वाचा