नवी मुंबई: नरेंद्र मोदी यांची देशाच्या पंतप्रधानपदी तिसऱ्यांदा निवड झाली असून याचा जल्लोष नवी मुंबई भाजपा जिल्ह्याच्या वतीने जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी खासदार संजीव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये साजरा करण्यात आला.

वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठ्या संख्येने जमलेले कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना मिठाई भरवत आनंद व्यक्त केला. संगीताच्या तालावर कार्यकर्त्यांनी नृत्यही केले. शिवाजी चौक यावेळी भारतीय जनता पक्षाच्या झेंड्यांनी बहरून गेला होता. यावेळी प्रतिक्रिया देताना माजी खासदार संजीव नाईक यांनी मोदीजी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार असून देशाची सेवा करण्यास सज्ज झाल्याचे सांगितले. आगामी पाच वर्षांमध्ये विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी काम सुरू होईल. मोदीजींच्या नेतृत्वाखालील सरकार आपल्या पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करून पुढील पाच वर्षांची पायाभरणी देखील करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

bjp mp udayanraje Bhosale
अखेर भाजप कार्यालयात उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजेंचे छायाचित्र
Baramati, Sant Tukaram Maharaj palkhi Ceremony, Ajit Pawar and Sunetra Pawar Participate in Sant Tukaram Maharaj palkhi, ajit pawar, sunetra pawar, ajit pawar Participate in Sant Tukaram Maharaj palkhi Ceremony, sunetra pawar Participate in Sant Tukaram Maharaj palkhi Ceremony, pune news, Baramati news,
अजित पवार, सुनेत्रा पवार यांनी केला विठूनामाचा गजर…
What Eknath Shinde Said?
“एकदा मार खाल्लाय,आता ताकही फुंकून…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना सल्ला
Thane NCP President, Thane NCP President anand paranjpe, anand paranjpe Criticizes Bulldozer Baba Posters, action on Illegal Pubs and Bars, Eknath shinde, thane news
महायुतीच्या नेत्यांनो, मुख्यमंत्र्यांचे बुलडोझर बाबा पोस्टर लावू नका; राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांचा पोस्टर लावणाऱ्या नेत्यांना टोला
Amol Mitkari
“गल्लीतील कार्यकर्ते अजित पवारांवर बोलतात, आम्ही शांततेने ऐकायचं का?”, अमोल मिटकरींचा महायुतीतील नेत्यांना सवाल
“…तर दगडालाही शेंदूर फासून लढण्याची तयार ठेवा,” खासदार अरविंद सावंत यांचे शिवसैनिकांना आवाहन; म्हणाले, “मातोश्रीचे आदेश…”
cm eknath shinde appeal workers of mahayuti
गाफील राहू नका, सडेतोड उत्तरे द्या! मुख्यमंत्र्यांचे महायुतीच्या कार्यकर्त्यांना आवाहन
Gulab Raghunath Patil
“…तर एकही खासदार निवडून आला नसता”; गुलाबराव पाटलांचा ठाकरे गटावर हल्लाबोल

हेही वाचा : पनवेलमधील महिलेची ऑनलाईन साडेपाच कोटी रुपयांची फसवणूक

लोकसभा निवडणुकीमध्ये संविधान बदलणार असल्याचा अपप्रचार विरोधकांनी केला. मोदीजींचे सरकार पुन्हा येणार नाही असा दावा विरोधक करत होते. परंतु तिसऱ्यांदा मोदी सरकार स्थापन होणार आहे, असे सांगून विरोधक आरोप करीत राहतील, सत्ताधारी म्हणून जनतेला दिलेल्या वचनांची पूर्तता करण्याचं काम आम्ही करू. लोकसभा निवडणुकीत राहिलेल्या उणिवा दूर करून आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये घवघवीत यश प्राप्त करू. असा विश्वास संजीव नाईक यांनी यावेळी व्यक्त केला. आनंदोत्सवामध्ये अनंत सुतार, रवींद्र इथापे, दशरथ भगत माधुरी सुतार, नेत्रा शिर्के, नवीन गवते, अमित मढवी, अरुण पडते यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकारी लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.