नवी मुंबई : राष्ट्रीय पेन्शन स्कीम (एनपीएस) रद्द करून जुनी पेन्शन योजना (ओपीएस) लागू करावी, अशी शासकीय कर्मचाऱ्यांची मागणी आहे. या मागणीसाठी राज्यातील १८ लाख कर्मचारी मंगळवारी १४ मार्चपासून बेमुदत संपावर आहेत. या संपात नवी मुंबई आरटीओ कर्मचारीही सहभागी झाल्याने कामकाज पूर्णपणे ठप्प झाले होते.
हेही वाचा – पनवेल: हळदी समारंभात धिंगाणा घालणा-या पोलीस उपनिरिक्षकावर गुन्हा दाखल
हेही वाचा – नवी मुंबई : कटरचा धाक दाखवून चोरी; अंगावरील जॅकेटसह चीज वस्तू घेऊन फरार
नवी मुंबई आरटीओ कार्यालयात सकाळपासूनच शुकशुकाट पहायला मिळाला. १७ कर्मचारी, शिपाई आणि ड्रायव्हर संपावर गेल्याने आरटीओ कामकाज पूर्णपणे ठप्प होते. आरटीओमध्ये शिकाऊ वाहन परवाना देणे, वाहन तपासणी, परवाना नूतनीकरण, वाहन नोंदणी, वाहनांची नोंदणी ते परमिट, फिटनेस संबंधी वाहनांची कामे झाली नाहीत. संपाची माहिती नसल्याने आरटीओ गाठणाऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला.