पनवेल : पनवेल शहरातील एका सेवानिवृत्त ६४ वर्षीय महिलेची ऑनलाईन पद्धतीने अपसंपदेचा धाक दाखवून फोनवरुन तब्बल साडेपाच कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. मागील महिन्यात (८ मे) ही घटना घडली असून दोन दिवसात या महिलेला पोलिसांची कारवाई होईल अशी भिती फोनवरुन दाखवून या महिलेची फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

संबंधित महिला या खासगी कंपनीत मानव संसाधन विभागात महिला काम करत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरिक्षक नितिन ठाकरे यांनी दिली. या महिलेने सेवानिवृत्त झाल्यावर आयुष्यभर जमविलेल्या बँकेतील रकमेवर भामट्यांनी ऑनलाईन पद्धतीने डल्ला मारला. ८ मे रोजी पळस्पे फाटा येथील साईवर्ल्डसीटी या संकुलामध्ये राहणाऱ्या ६४ वर्षीय महिलेला फोनवरुन सकाळी साडेनऊ वाजता संपर्क साधून फोनवरील व्यक्तीने त्याची ओळख सीबीआय अधिकारी असल्याचे सांगितले. तसेच दुसऱ्या व्यक्तीने तो मुंबई येथील टेलीकॉम रेग्युलेटरी प्राधिकरणाचा नोटरी अधिकारी असल्याची ओळख सांगितली. या दोनही भामट्यांनी ६४ वर्षीय महिलेला ‘तुमच्या मोबाईलवरुन इतरांना फोन करुन मानसिक त्रास दिला जात असून त्याच्या तक्रारी सीबीआयकडे नोंदविल्याचे’ सांगण्यात आले. त्यामुळे या महिलेच्या अपसंपदेची तक्रार सीबीआयकडे केल्याने १० वर्षाचा तुरुंगवास भोगण्याची भीती दाखविण्यात आली.

share market fraud marathi news
पनवेल: शेअर बाजारातील नफ्याचे आमिष दाखवून महिलेची सव्वा चार कोटी रुपयांची फसवणूक
Mumbai fake gold fraud marathi news
मुंबई: बनावट सोने बँकेत गहाण ठेऊन १.३८ कोटींची फसवणूक, आरोपीला अटक
Investment of 25 thousand and established a company worth seven thousand crores
Success Story: वयाच्या २९ व्या वर्षी २५ हजारांची गुंतवणूक आणि उभी केली तब्बल तेरा हजार कोटींची कंपनी
More than eleven and a half thousand houses sold in Mumbai in June
जूनमध्ये मुंबईत साडेअकरा हजारांहून अधिक घरांची विक्री, मागील बारा वर्षातील जूनमधील सर्वाधिक गृहविक्री
emcure pharmaceuticals ipo emcure pharma ipo to open on july 3rd
एमक्यूआर फार्माची प्रत्येकी ९६० ते १००८ रुपयांना भागविक्री
Burglary of Rs 52 lakh in Kharghar
खारघरमध्ये ५२ लाख रुपयांची घरफोडी
Ganja, Charas, MD, thane,
ठाण्यातील तरुणाईला गांजा, चरस आणि एमडीचा विळखा; मागील दीड वर्षांत चार हजाराहून अधिक जणांविरोधात गुन्हे दाखल
ca amber dalal marathi news
११०० कोटींची फसवणूक: अंबर दलाल प्रकरणी ईडीकडून गुन्हा दाखल, मुंबईत छापे; डीमॅट, बँक ठेवी अशी ३७ कोटींची मालमत्ता गोठवली

हेही वाचा…तळोजा कारागृहाच्या बंदोबस्तातून बंदी पळाला

सीबीआयने कारवाई करु नये यासाठी पिडीत सेवानिवृत्त महिलेकडून ५ कोटी ६१ लाख १ हजार रुपये विविध बँक खात्यात वळते करण्यास भाग पाडले. याबाबत या पिडीत महिलेने सर्वत्र खात्री केल्यानंतर त्यांना हा सर्व बनाव असल्याचे उघड झाले. शुक्रवारी याबाबत पिडीत महिलेने पोलिसांत तक्रार नोंदविली आहे. नवी मुंबई पोलीस दलाचे आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग या प्रकरणी ऑनलाईन भामट्यांचा शोध घेत आहेत. या फसवणूकीमध्ये चोरट्यांनी मुंबई पोलीस १११ या नावाच्या युआरएलचा वापर केला तसेच स्काईप पत्यावर सीआयडी असा उल्लेख असल्याने पिडीत महिलेला काही वेळेसाठी हे सर्व खरे असल्याचे वाटल्याने ही फसवणूक झाली.