लोकसत्ता प्रतिनिधी

पनवेल: राज्य सरकारने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय शहर सौंदर्यीकरण स्पर्धा २०२२ मध्ये पनवेल महानगरपालिकेने ड वर्ग महानगरपालिकांच्या गटामध्ये राज्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. नगर विकास दिनाचे औचित्य साधून गुरुवारी मुंबई एनसीपीए येथे झालेल्या भव्य समारंभामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पनवेल पालिकेच्या आयुक्त आणि अधिका-यांना पुरस्कार व १५ कोटी रुपयांचा धनादेश तसेच सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

bjp to defeat mamta banerjee in loksabha
ममतादीदींच्या तृणमूलचा पराभव करण्यासाठी भाजपाला ‘या’ जागा जिंकण्याची गरज; पश्चिम बंगालमध्ये पक्षाची स्थिती काय?
piyush goyal
कर्तबगारीने ‘तेजांकित’ झालेल्यांचा गौरव!
Analysis on Environmental Component in Gazetted Civil Services Joint Pre Examination and State Services Pre Examination
Mpsc मंत्र: पर्यावरण घटक
navi mumbai, nerul, save Kandalvan protest, Cricket umpires, association, activate, environment, marathi news,
कांदळवन वाचवण्यासाठी क्रिकेट पंच संघटनाही सक्रिय, नेरुळच्या चाणक्य तलाव परिसरात आंदोलन

यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, प्रधान सचिव सोनिया सेठी, आयुक्त किरण कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. हा पुरस्कार स्विकारताना पालिका आयुक्त तथा प्रशासक गणेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रशांत रसाळ, उपायुक्त सचिन पवार, सहाय्यक आयुक्त डॉ. वैभव विधाते हे उपस्थित होते.

हेही वाचा…. नवी मुंबई: क्षुल्लक कारणावरून दुकानमालकाच्या हत्येचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना अटक

राज्याच्या नगरविकास विभागाने राज्यातील सर्व महानगरपालिका व नगरपालिका यांकरिता शहर सुधारणा व सौंदर्यीकरण स्पर्धा २०२२ आयोजित केली होती. यामध्ये विविध घटकांनुसार गुणांकन पद्धतीने वर्गनिहाय प्रत्येक प्रशासकीय विभागातील निवडलेल्या सर्वोत्कृष्ट महानगरपालिका व नगरपालिका यांची राज्यस्तरीय तपासणी समितीने पाहणी करून पनवेल पालिकेची निवड केल्याचे पालिकेने सांगीतले.

हेही वाचा…. उरण-पनवेल मार्गावरील खाडीपूल दुरुस्तीची प्रतीक्षाच? पावसाळ्यापूर्वी काम अशक्य

या स्पर्धेसाठी पालिका क्षेत्रातील मध्यवर्ती चौक, ऐतिहासिक वारसा स्थळे व स्मारक, जलाशयांचे संवर्धन, बाजारपेठा यांचे सौंदर्यीकरण तसेच सुंदर हरित पट्ट्यांची निर्मिती, विविध भागातील स्वच्छता असे वेगवेगळे स्वच्छतेसाठी उपक्रम पालिकेने राबविले. पालिका क्षेत्रात भिंतीना रंगविण्यासाेबत शाश्वत सौंदर्यीकरण केल्याने निवड समितीवर प्रभाव पाडता आल्याचे पालिकेने सांगीतले. जलाशयांबाबत दीर्घकालीन उपाययोजना करताना वडाळे तलावामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे संवर्धन व सुशोभीकरण करण्यात आले आहे.

“सध्या सुरू असलेल्या विकासकामांमुळे पनवेल महानगरपालिका राष्ट्रीय पातळीवर स्वतःची वेगळी ओळख निश्चितच निर्माण करेल यात शंका नाही, शहराच्या विकासामध्ये सहभाग घेतलेले सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी, शहरातील सर्व नागरिक यांच्या सहभागामुळे व सकारात्मक प्रतिसादामुळेच प्रशासनाला हे यश प्राप्त करता आले.” – गणेश देशमुख, आयुक्त, पनवेल महानगरपालिका