हिवताप रुग्णांत वाढ

गेल्या महिन्यात महापालिका प्रशासनाने डास उत्पत्ती केंद्रे नष्ट केल्यानंतरही शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढला.

डासांचा प्रादुर्भाव वाढला; प्रशासन सतर्क

नवी मुंबई : गेल्या महिन्यात महापालिका प्रशासनाने डास उत्पत्ती केंद्रे नष्ट केल्यानंतरही शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढला. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर होत आहे. थंडी, ताप, मलेरिया, डेंग्यू संशयित रुग्णांत वाढ दिसत असून मेलेरियाचे ४० रुग्ण सपाडले आहेत. गेल्या वर्षी पक्त २६ रुग्ण होते.

यामुळे महापालिका प्रशसनाने शहरात उपाययोजना सुरू केल्या आहेत. डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी गेल्या वर्षभरात ४३१७ ठिकाणी गप्पी मासे सोडले असून यात नवीन १२३५ ठिकाणी गप्पी मासे सोडण्यात आले आहेत. शहरातील अंतर्गत झाकण बंद असलेली मुख्य गटारे स्वच्छ करता येत नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

कोपरखैरणे, कोपरी गाव, जुहूगाव, घणसोली व ऐरोली या ठिकाणी डासांचा अधिकचा प्रादुर्भाव आहे. या ठिकाणी अंधार होण्याआधीच घरांची दारे, खिडक्या बंद होत आहेत. घणसोलीच्या मध्य भागातून मोठा नाला गेला असून तो बहुतांश ठिकाणी उघडा आहे. त्यामुळे या नाल्यालगत राहत असलेल्या रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दुर्गंधी तर पाचवीलाच पुजलेली आहे, आता डासांमुळे दारे खिडक्या बंद करून बसावे लागत असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. कोपरखैरणे भाग हा खाडीलगत असल्याने या ठिकाणी अधिक प्रादुर्भाव आहे. हवामानात बदल झाल्याने देखील डासांचे प्रमाण वाढले आहे.

सिडको वसाहतीत अंतर्गत घरांच्या पाठीमागून मलनिस्सारण वाहिनी, तर समोरून अंतर्गत छोटी, मुख्य गटारे आहेत. पूर्वी अंतर्गत रस्त्याला लागूनच पदपथ आणि त्याखाली झाकण बंद गटारे होती. रस्ता रुंदीकरणात ती बंदिस्त झाली असून झाकणे उघडता येत नाहीत. त्यामुळे औषध फवारणी व इतर उपाययोजना करता येत नसल्याने डासांचे प्रमाण वाढले आहे. तसेच सिडको वसाहतीतील घरांच्या मागील बाजूने १५ वर्षे जुने असलेली मलिनिस्सारण वाहिनी आहे. नवीन बांधकामे होत असताना ही वाहिनी खाली दबली गेली आहे.  त्यामुळे या ठिकाणी स्वच्छता करता येत नाही. अशा अनेक कारणांनी शहरात डासांची उत्पत्ती वाढली असून थंडी, ताप, मलेरिया, डेंग्यू संशयित रुग्णांत वाढ होत आहे.

डास उत्पत्ती शोध महिमेअंतर्गत महापालिका प्रशासनाने आतापर्यंत ८४,६७१ घरांना भेटी दिल्या असून त्यापैकी ३५६ घरांत डास उत्पत्ती आढळून आली आहे. तसेच ८१,२१२ घरांना भेटी देत ७८५ जणांचे रक्त नुमने व १२३५ मास रक्त नुमने घेण्यात आले आहेत. जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत ७८,९२५ संशयित मलेरिया रुग्णांचे रक्त नमुने घेण्यात आले होते. त्यापैकी ४० जणांना मलेरिया झाल्याचे समोर आले आहे.

३५६ घरांत डास उत्पत्ती

करोना रुग्णांत घट होत असताना शहरात मेलेरियाने डोके वर काढले आहे. आता हिवाळा सुरू झाला असून डासांचा प्रादुर्भाव देखील वाढला आहे. त्यामुळे महापालिकेने धुरीकरण, फवारणी, गप्पी मासे सोडणे आदी उपाययोजना करणे सुरू केले आहे. पालिकेच्या पाहणीत ३५६ घरात डास उत्पत्ती केंद्रे आढळली आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नवी मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Increase fever malaria patients ysh

Next Story
मलेरिया, डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज
ताज्या बातम्या