नवी मुंबई: एपीएमसी बाजारात बटाट्याच्या दरात वाढ; नवीन बटाट्याची आवक वाढली |Increase in potato prices in apmc market Inflow of new potatoes increased in navi mumbai | Loksatta

नवी मुंबई: एपीएमसी बाजारात बटाट्याच्या दरात वाढ; नवीन बटाट्याची आवक वाढली

यंदाच्या हंगामात कांद्या पेक्षा बटाटे वरचढ ठरत होते . जानेवारी – फेब्रुवारी मध्ये प्रति किलो कांदा २० रुपयांच्या आत मध्ये होता तर बटाट्याने २५ ते ३० गाठली होती.

नवी मुंबई: एपीएमसी बाजारात बटाट्याच्या दरात वाढ; नवीन बटाट्याची आवक वाढली
संग्रहित छायाचित्र / लोकसत्ता

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील महिन्यात कांद्याबरोबर बटाट्याच्या दरातही घसरण झाली होती. परंतु आता बाजारात नवीन बटाट्याची आवक सुरू झाली असून जुना बटाट्याची कमतरता भासत आहे तर आणि नवीन बटाट्याला मागणी वाढली आहे . त्यामुळे जुना बटाटा आणि नवीन बटाट्याच्या दरातही वाढ झालेली आहे. आधी प्रति किलो १५ ते १८ रुपयांनी उपलब्ध असलेला बटाटा आता २० ते २२ रुपयांवर विक्री होत आहे . जुन्या पेक्षा नवीन बटाट्याला मागणी अधिक असल्याने नवीन बटाट्याचे दरही चढेच आहेत.

यंदाच्या हंगामात कांद्या पेक्षा बटाटे वरचढ ठरत होते . जानेवारी – फेब्रुवारी मध्ये प्रति किलो कांदा २० रुपयांच्या आत मध्ये होता तर बटाट्याने २५ ते ३० गाठली होती. मागील महिन्यात कांद्याबरोबरच बटाट्याचे दरही आटोक्यात आले होते. परंतु आता पुन्हा बटाट्याच्या दरात ४ ते ६ रुपयांची वाढ झालेली आहे. यंदा सुरुवातिला पाऊस एक महिना लांबल्याने नवीन बटाट्याची लागवड एक महिना उशिरा करण्यात आली. त्यामुळे बाजारात मागणीच्या तुलनेत बटाटा कमी दाखल होत असल्याने दर चढेच आहेत.

हेही वाचा: नवी मुंबई : फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांचे किरीट सोमय्यांना साकडे; सोमय्यांनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट

सध्या बाजारात उत्तर प्रदेश, इंदोर आणि तळेगाव येथून बटाटा दाखल होत असून ४० गाड्या आवक झालेली आहे. त्यापैकी १५ गाड्या नवीन बटाट्याच्या असून २ गाड्या तळेगावातुन तर उर्वरित गाड्या इंदोर मधून दाखल होत आहेत. जुना बटाटा गोडसर लागत असल्याने नवीन बटाट्याला मागणी आहे. नवीन बटाटा चवीला अधिक असल्याने त्याला नेहमीच बाजारात मागणी असते.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-12-2022 at 15:11 IST
Next Story
नवी मुंबई : फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांचे किरीट सोमय्यांना साकडे; सोमय्यांनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट