उरण : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षांनिमित्ताने उरणमध्ये रविवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मिरवणुका, व्याख्याने यासह उरण शहरात प्रथमच १३ फूट खोल पाण्यात ध्वजारोहण करण्यात आले.  नौदलातील निवृत्त दहा माजी मरिन कमांडो रवींद्र कुलकर्णी यांच्या नेतृत्वात सहभाग घेत तरण तलावामधील १३ फूट खोल पाण्याखाली ध्वजसंचलन आणि ध्वजवंदन करण्यात आले. ही संकल्पना उरणचे आ. महेश बालदी यांची होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यंदा स्वातंत्र्य दिनाचे अमृतमहोत्सवी वर्ष म्हणून जल्लोषात साजरे करण्यात येत आहे. यासाठी, प्रत्येक भागात आगळय़ावेगळय़ा संकल्पना आखत नागरिक हा दिन साजरा करीत आहेत. याचाच एक भाग म्हणून उरण शहरातील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुलात पाण्याखाली स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी, माजी मरिन कमांडो यांच्या संकल्पनेतून सोहळा साजरा करताना तरण तलावामधील १३ फूट खोल पाण्याखाली ध्वजसंचलन आणि ध्वजवंदन केले. रविवारी रात्री बारा वाजून एक मिनिटांनी हे ध्वजवंदन करण्यात आले. या वेळी, दहा कमांडोंनी सुमारे अर्धा तास पाण्याखाली ध्वजसंचलन केले.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Independence day 2022 flag hoisting underwater in uran zws
First published on: 16-08-2022 at 16:08 IST