पनवेल : पनवेल महापालिकेने ८ ऑगस्टला जाहीर केलेल्या प्रारूप विकास आराखड्यावर हरकती आणि सूचना देण्यासाठी ७ सप्टेंबरची अंतिम मुदत संपण्यापूर्वीच आणखी महिनाभराची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी भारतीय शेतकरी कामगार पक्षाने केली आहे. या मागणीचे लेखी निवेदन शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील यांनी पनवेल महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांना दिले आहे.

पनवेल महापालिका क्षेत्राची सद्या:स्थितीत अंदाजित लोकसंख्या नऊ लाखांवर असली तरी पनवेल महापालिकेचा कारभार २००१ सालच्या भारतीय जनगणेनुसार चालतो. २००१ साली पालिका क्षेत्रात सध्या समावेश झालेली २९ गावे, पनवेल शहर, कळंबोली, नवीन पनवेल, खांदेश्वर, कामोठे, खारघर व तळोजा या उपनगरांची लोकसंख्या पाच लाखांच्या आत असल्याचे पालिकेच्या प्रत्येक सरकारी नियोजनात दर्शविते.

Applications of 12400 aspirants in 24 hours for CIDCOs Mahagrihmanirman Yojana
सिडकोच्या महागृहनिर्माण योजनेसाठी २४ तासांमध्ये १२,४०० इच्छुकांचे अर्ज
9 years old girl molested by luring chocolates in kalamboli
पनवेल : कळंबोलीत चॉकलेटचे आमिष दाखवून बालिकेवर अत्याचार
Navi Mumbai, Road tax waived,
नवी मुंबई : राज्यशासनाकडून पथकर माफी, मनसेचा जल्लोष
navi Mumbai fire marathi news
नवी मुंबई: एनआरआय संकुलातील सदनिकेत भीषण आग
Airoli Vidhan Sabha Election 2024 Ganesh Naik
Airoli Assembly constituency : महायुती आणि मविआत अंतर्गत रस्सीखेच; ऐरोलीसाठी कोण ठरेल वरचढ?
CM Eknath Shinde inaugurated marine highway bridge connecting Karanja Uran to Revas Alibag
रेवस रेड्डी सागरी महामार्गावरील करंजा, रेवस पुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दुरदृश प्रणालीने भूमीपूजन
APMC plans to implement fast tag system at entrances to ease vehicle congestion in Vashi market
एपीएमसी प्रवेशद्वारावर फास्टॅग प्रणाली
Unauthorized constructions increasing in Navi Mumbai including Morbe dam area supplying water
मोरबे धरण बफर क्षेत्रात अनधिकृत बांधकाम?
10000 residents of Swapnpurti housing complex in Kharghar faced insufficient water supply for eight days
खारघरमधील स्वप्नपूर्ती संकुलात अपुरा पाणीपुरवठा

हे ही वाचा…उरणकरांची सुरक्षितता रामभरोसे?

नगरविकास विभागाच्या नियमानुसार ज्या महापालिकांची लोकसंख्या ५ लाखांच्या आत आहे अशा महापालिकेचा प्रारूप विकास आराखड्यावर हरकती व सूचनांचा कालावधी नगरविकास विभागाने ३० दिवसांचा दर्शविला आहे. त्यामुळे शेकापने केलेली हरकती करण्यासाठी मुदतवाढीची मागणी किती टिकेल याविषयी साशंकता आहे. तसेच शेकापने प्रारूप विकास आराखडा सामान्य शेतकऱ्यांना समजण्यासाठी त्या प्रारूप आराखड्यातील सांकेतिक चिन्हे व इतर बाबी मराठी भाषेतून भाषांतरित करून शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी केली आहे.

हे ही वाचा…कोपरखैरणेत पदपथांची दुरुस्ती अखेर सुरू, सेक्टर १९ येथील मोठ्या खड्ड्यांमुळे पदपथ दोरी बांधून वापरासाठी बंद

पालिकेच्या संकेतस्थळावर आजच उपलब्ध असलेल्या प्रारूप विकास आराखड्यातील सांकेतिक चिन्हे व त्या संबंधित दिशादर्शके मराठी भाषेत करण्यासाठी सूचना दिल्या असून ते बदल आजच संकेतस्थळावर नागरिकांना झालेले दिसतील. हरकत व सूचनांसाठी मुदतवाढ देणे ही बाब महापालिका अधिनियमात नसल्याने त्या बाबतीत निर्णय पालिका स्तरावर होऊ शकत नाही. पनवेल पालिकेने विविध सेलच्या माध्यमातून प्रारूप विकास आराखडा नागरिकांसाठी उपलब्ध केला आहे. पालिकेने तेथे अधिकारी नेमले आहेत. नागरिकांनी त्यांच्या हरकती व सूचना ७ सप्टेंबर पूर्व लेखी स्वरुपात नोंदवावे. -मंगेश चितळे, आयुक्त, पनवेल महापालिका