पुढील आठवड्यात दिवाळी सुरु होत असल्याने नागरिकांची खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये एकच गर्दी झाली आहे. आकाश कंदील, रांगोळ्या, लक्ष्मीदेवीच्या मूर्ती, पणत्या खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होऊ लागली आहे. यंदा प्लास्टिक कंदील हद्दपार झाले असून भारतीय बनावटीचे आकर्षक कागदी ,कापडी कंदील दाखल झाले आहेत. ग्राहकांकडून या कंदीलांना पसंती दिली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : चंद्रकांत पाटील करणार अजितदादांचा ‘हिशोब’ चुकता

दिवाळीत सर्वत्र दीपोत्सव साजरा केला जातो. घराबाहेर पणत्या आणि आकाश कंदील लावले जातात. त्यामुळे दिव्यांबरोबरच आकाश कंदीलांना अनन्यसाधारण महत्त्व आहे .बाजारात यंदा मोठ्या प्रमाणात कागदी आणि कापडी कंदील दाखल झाले आहेत. तर चिनी आकाश कंदील तुरळक प्रमाणात आहेत. मात्र ग्राहकांकडून आकर्षित स्वदेशी बनावटीचे असलेल्या पर्यावरण पूरक कंदिलांना प्राधान्य दिले जात आहे. गेल्या काही वर्षांपासून चायना मेड आकाश कंदील मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येत होते. यंदा चिनी आकाश कंदील तुरळक प्रमाणात आहेत. देशी बनावटीच्या आकाश कंदीलांना यंदा चांगली मागणी आहे. कापडी कंदीलावर विणकाम आणि नक्षीकाम करण्यात आले असून विविध प्रकारच्या लेस लावून सजवाट करण्यात आली आहे. हे कंदील बाजारात २१० रु ते १६५० रुपयांपर्यंत आहेत . कागदी कंदील कार्ड बोर्ड पेपर आणि स्पंच तसेच लाकडी बॉर्डर लावून त्यावर विविध प्रकारचे चकमकीत रंगीबेरंगी मणी , मोती लावून सजावट करण्यात आलेले हे कंदील ५९० रु ते १२००रुपयांवर आहेत.

हेही वाचा : बीपीसीएल कंपनीने नोकरीचे आश्वासन न पाळल्याने भूमिपुत्र तरुणाचे आंदोलन

भेटवस्तू देण्यासाठी गिफ्ट बास्केटचा ट्रेंड

करोनामुळे दोन वर्ष दिवाळी अगदी साध्या पद्धतीने कोणाच्याही संपर्कात न येता साजरी करण्यात आली होती . तसेच खासगी मोठ्या कंपन्यांमधून देखील त्यांच्या कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देण्याचे टाळले होते . यंदा आता गणेशोत्सवानंतर दिवाळी देखील धुमधडाक्यात साजरी करण्यात येत आहे. त्यामुळे बाजारातही ग्राहकांचा खरेदीसाठी उत्साह दिसून येत आहे. सध्या बाजारात गिफ्ट बास्केटचा ट्रेंड आला आहे. आपल्या आप्तेष्टांना भेटवस्तू देण्यासाठी या गिफ्ट बास्केटला मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. काळानुरूप गिफ्ट पॅकिंगमध्ये वेगवेगळे बदल झाले असून अधिक आकर्षित गिफ्ट पॅकिंग केले जात आहे. बाजारात सध्या गिफ्ट बास्केटची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. यामध्ये फायबर, लाकडी , तसेच बांबूच्या काड्यांपासून टोपली, मोठ्या परडी उपलब्ध आहेत. यामधून सुका मेवा, दिवाळी फराळ , चॉकलेटस विविध प्रकारचे बिस्किट्स आकर्षक पद्धतीने पॅकिंग करून भेटवस्तू देण्यासाठी गिफ्ट बास्केटची मागणी वाढली आहे , अशी माहिती विक्रेता सुरेश गोस्वामी यांनी दिली आहे

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian made paper and cloth lanterns are attractive diwali 2022 navi mumbai market tmb 01
First published on: 19-10-2022 at 12:30 IST