आद्योगिक विकास महामंडळाने नवी मुंबई मनपाला हस्तांतरित केलेला भूखंड तिसऱ्यालाच विकल्याचा धक्कायक प्रकार समोर आला आहे. सदर भूखंडावर मनपाने विकसित केलेले उद्यान नव्या मालकाने उद्यान उध्वस्त करून स्वतःचे बांधकाम सुरु करताना शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अटकाव केला. या बाबत नवी मुंबई मनपाला माहिती मिळताच त्यांनीही घटनास्थळी धाव घेत काम बंद केले.

हेही वाचा- मोदी सरकार विरोधात नवी मुंबई जिल्हा काँग्रेसचे वाशी एलआयसी कार्यालयाबाहेर आंदोलन
 
एकच भूखंड किवा सदनिका अनेक लोकांना विकल्या प्रकरणी नवी मुंबईत रोज गुन्हे दाखल होत आहेत. मात्र पहिल्यांदाच आद्योगिक विकास महामंडळाने नवी मुंबईकडे हस्तांतरित केलेला भूखंड परस्पर अन्य व्यक्तीला विकल्याचा प्रकार पहिल्यांदाच घडला आहे. असा थेट आरोप शिवसेनेने केला आहे. २६ जुलै २००१ रोजी औद्योगिक विकास महामंडळाने   नवी मुंबई महानगरपालिकेला वृक्ष लावण्यासाठी त्याचप्रमाणे उद्यानासाठी आद्योगिक वसाहतीतील काही भूखंड हस्तांतरित केले होते. त्यापैकी इंदिरा नगर तुर्भे येथे शांताबाई सुतार हे उद्यान विकसित केले होते. सोमवारी या ठिकाणी उद्यान उधवस्त करण्यासाठी जेसीबी लाऊन काम सुरु होते. या बाबत माहिती मिळताच  शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पदाधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली वस्तुस्थिती पाहिली आणि तसेच या ठिकाणी विचारणा केली असता सदर भूखंड विकण्यात आला असून त्याचा ताबा घेत आमचे काम सुरु असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. त्यामुळे ही बाब मनपाच्या निदर्शनास आणण्यात आली. घटनेचे गांभीर्य ओळखत तुर्भे विभागाचे सहाय्यक आयुक्त सुखदेव येडवे आणि मालमत्ता विभागाच्या अधिकाऱ्यांनी जागेवर जाऊन पाहणी केली. त्यांनी सदर काम बंद केले.

Farmers, Farmers news,
प्रकल्प घोषणेपूर्वी शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे
Municipal Corporation ignoring quakes in navi mumbai delayed in making rule for builders
नवी मुंबई : हादऱ्यांच्या मालिकेकडे महापालिकेचा काणाडोळा, बिल्डरांच्या सोयीसाठी नव्या नियमावलीला मुहूर्त सापडेना
wheat, farmers
केंद्राचा ‘हा’ निर्णय गहू उत्पादक शेतकऱ्यांच्या मुळावर?
ie think our cities
IE THINC Second Edition: “लवकरच असमानता आणि हवामान बदल ही आपल्या शहरांसमोरची सर्वात मोठी आव्हानं ठरतील!”

हेही वाचा- नवी मुंबई : खासगी शाळांची मैदाने झाली टर्फची मैदाने; तर पालिकेची खेळाची मैदाने दुर्लक्षित

 शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय  काकडे यांची भेट घेऊन त्यांना या संदर्भात विस्तृत निवेदन दिले. यावेळी  शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांच्यासोबत उपशहरप्रमुख महेश कोटीवाले, विनोद मुके, माजी .परिवहन सदस्य,विभागप्रमुख समीर बागवान,बाळकृष्ण खोपडे, प्रेमराज जाधव, उपविभाग प्रमुख किशोर लोढे, शाखाप्रमुख अशोक भामरे,महेश हलवाई, जहागीर शेख हे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच मंगळवारी आद्योगिक विकास मंडळातील समंधीत अधिकार्यांना जाब विचारणार असल्याची माहिती उपशहर प्रमुख महेश कोटीवाले यांनी दिली.

हेही वाचा- नवी मुंबई : भाडे नाकारणाऱ्या मुजोर रिक्षा चालकांवर विशेष पथकाची कारवाई

संजय काकडे (अतिरिक्त आयुक्त मनपा) घटनास्थळी आमच्या अधिकाऱ्यांनी जाऊन पाहणी केली आहे. एमआयडीसीने हा भूखंड आमच्या कडे हस्तांतरित केला आहे.तरीही असे घडणे गंभीर असून या बाबत एमआयडीसीशी संपर्क करून योग्य ती पाउले उचलली जातील. याबाबात एमआयडीसी अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचा अनेकदा प्रयत्न केला मात्र प्रतिसाद न मिळाल्याने प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

हेही वाचा- सततच्या हवामान बदलामुळे शहरात सर्दी ताप, खोकल्याचे रुग्ण वाढले

सदर भूखंड ठराविक काळासही मनपाकडे हस्तांतरित केलेला असू शकतो. त्या बाबत कागदपत्रे तपासणी लवकरात  केली जाणार आहे. शिवाय मुदत संपली असली तरीही मनपा कडून रितसर पुन्हा एमआयडीसी कडे भूखंड हस्तांतरित करण्याची प्रक्रिया पार पडल्या नंतरच त्या भूखंडा विषयी निर्णय एमआयडीसी घेऊ शकते. भाडे पट्ट्याची मुदत संपली तरीही भाडे करूच्या अपरोक्ष घर मालक सामान बाहेर काढू शकत नाही आणि त्याचे नुकसान हि करू शकत नाही. हेच एमआयडीसीने केले आहे. अशी धक्कादायक माहिती एका अधिकाऱ्याने दिली. चौकट सदर भूखंड २५ हजार प्रती चौरस मीटर दराने विकण्यात आला असून तब्बल ५ कोटी ५२ लाख ३७ हजार ६०० रुपयांचा व्यवहार झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.