घरात शिरत असल्याने नागरिक त्रस्त

नवी मुंबई : कोपरखैरणे परिसरात गेल्या काही दिवसांपासून किटकांचा (अळ्या) प्रादुर्भाव दिसत असून आता हे कीटक घरातही शिरत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. सेक्टर ९ ,१०,११,१२ परिसरात हा प्रकार जास्त असून त्यामुळे अंगाला खाज सुटत असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. याबाबत प्रशासनही अनभिज्ञ आहे.

Birds mumbai, Birds suffer from heat,
मुंबई : वाढत्या उष्म्याचा पक्ष्यांना त्रास, १६ दिवसांमध्ये १०० हून अधिक पक्षी व प्राणी रुग्णालयात दाखल
Loksatta explained Many birds are on the verge of extinction but why is this happening
कित्येक पक्षी नामशेषत्वाच्या मार्गावर… पण असे का घडत आहे?
Indiscriminate firing in nagpur by criminal over money of MD
नागपुरात एमडीच्या पैशावरून गुन्हेगाराचा अंधाधुंद गोळीबार, कुख्यात टोळ्या पुन्हा…
village maps
गाव नकाशे नसल्याने मच्छीमारांचे अस्तित्व धोक्यात, पंचवीस वर्षांपासून प्रतीक्षा

दोन आठवडय़ांपासून कोपरखैरणे सेक्टर ९ ते १२ या परिसरातील रहिवाशांना या किटकांचा प्रादुर्भाव दिसून आला होता. काही जागरूक नागरिकांनी महापालिकेच्या विभाग कार्यालयास याबाबत माहिती  दिल्यानंतर विभाग अधिकारी आणि स्वच्छता अधिकाऱ्यांनी पाहणी केली. त्यावर ब्लिचिंग पावडरची  फवारणी करण्यात आली. मात्र यामुळे हे कीटक कमी होण्यापेक्षा त्याचा प्रादुर्भाव वाढला असून आता ते नागरिकांच्या घरातही आढळत आहेत.

याबाबत महापालिकेचे विभाग कार्यालयातील अधिकारीही हैराण आहेत. पावसाळी विविध कीटक दिसून येतात मात्र कीटक प्रथमच पाहण्यात येत आहेत.

या प्रभागात राहणाऱ्या अपर्णा पाटील यांनी सांगितले की हे कीटक पूर्वी फक्त बाहेर दिसत होते. आता फवारणीनंतर ते घरात घुसले आहेत. पावसामुळे एक तर घरात दमट वातावरण आहे. त्यात घरातील विविध ओलाव्याच्या ठिकाणी हे कीटक आढळत आहेत, तर मंगेश सोनवणे यांनी सांगितले की, कपडय़ांमध्येही हे कीटक शिरत आहेत. नकळतपणे कपडे घेतल्यास ते वळवळत असून त्यामुळे अंगाला खाजही सुटत आहे. या विषयी कोपरखैरणे वैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

ही समस्या निराकरणासाठी स्वच्छता अधिकारी, विभाग अधिकारी, कोपरखैरणे वैद्यकीय अधिकारी या सर्वाना सांगितले आहे. मात्र हे कीटक नेमके कसले आहेत हे समजले नाही. यामुळे नागरिकांमध्ये भीती आहे.

-रामदास पवळे; माजी नगरसेवक

किटकांचा नायनाट करावा म्हणून जंतुनाशक फवारणी केली. मात्र त्यामुळे हे कीटक आता घरातील भिंतीवर दिसत आहेत. त्यांचे नाव माहीत नाही. याबाबत आरोग्य विभागाला कळवण्यात आले असून लवकरच उपाययोजना केली जाईल.

-योगेश गावडे, विभाग अधिकारी