नवी मुंबई : शासनाने १ ऑक्टोबरपासून शाळा सुरू होणार असल्याचे जाहीर केल्यानंतर नवी मुंबई महापालिका शिक्षण विभागाने शुक्रवारी सर्व शाळांच्या मुख्याद्यापकांची बैठक घेतली. यात करोना नियमावलीचे शाळेत कठोर पालन करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

शाळा सुरू करण्यापुर्वी सर्व शाळांमध्ये स्वच्छता, जंतूनाशक फवारणी करण्याच्या सूचना शाळा व्यवस्थपनांना देण्यात आल्या आहेत. मात्र सुरक्षा अंतराचा प्रश्न असून नियोजन कसे करावे असा पेच शाळांपुढे आहे.

शाळा सुरू करण्याबाबतची पूर्वतयारी सुरू करण्यात आली असून  मुख्याद्यापकांची बैठक घेत नियमावलीबाबत सूचना देण्यात आल्या असल्याचे पालिकेचे शिक्षण अधिकारी जयदीप पवार यांनी सांगितले.