scorecardresearch

नवी मुंबई : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणारा जेरबंद

तळोजा गावातील आदिक मन्सूर पटेल (वय २४) याने लग्नाचे आमिष दाखवून पीडित मुलीबरोबर वारंवार तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध स्थापित केले.

sexual assault minor girl navi mumbai
लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणारा जेरबंद (प्रातिनिधिक छायाचित्र)

एका अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीस जेरबंद करण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे. तळोजा गावातील आदिक मन्सूर पटेल (वय २४) याने लग्नाचे आमिष दाखवून पीडित मुलीबरोबर वारंवार तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध स्थापित केले. त्यात पीडित ही गरोदर राहिली दोन दिवसांपूर्वी तिची प्रसुती झाली, त्यात पुरुष जातीचे बालक जन्माला आले व लगेच त्याचा मृत्यू झाला.

लग्नाचे आमिष आणि बलात्कार प्रकरणी एनआरआय पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत २९ जानेवारीला गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा गंभीर असल्याने पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले. सुचनेनुसार गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून गुन्हे शाखा सहाय्यक आयुक्त विनायक वस्त यांनी सदर गुन्ह्यातील आरोपीस तात्काळ अटक करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांच्या नेतृत्वाखाली पथक नेमण्यात आले.

हेही वाचा – कोकण शिक्षक मतदारसंघ निवडणूक: मतांसाठी उमेदवारांनी पैसे वाटल्याची चर्चा

हेही वाचा – विश्लेषण: कल्याण ते नवी मुंबई १५ मिनिटांत? ऐरोली-काटई मार्ग वाहतुकीसाठी महत्त्वाचा कसा?

पोलीस हवालदार जोशी, पोलीस नाईक राजेश मोरे, सुधीर पाटील आरोपीचा शोध घेत असतांना आज (मंगळवारी) अपरात्री एकच्या सुमारास आरोपी हा आस्का मजीदजवळ तळोजा गावात येणार असल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती बातमीदारमार्फत प्राप्त झाली. आरोपीस तात्काळ ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपीला पुढील तपासासाठी खारघर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-01-2023 at 11:27 IST