scorecardresearch

उरण: जासई उड्डाणपुलाचे आठ वर्षांपासून रखडलेले काम पूर्ण होण्यास २०२३ उजाडणार

वाहतूक कोंडी मधून प्रवाशांची सुटका करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणा कडून जासई येथील दास्तान ते शंकर मंदीर असा १.२ किलोमीटर लांबीच्या उड्डाणपुलाची उभारणी करण्यात येत आहे.

उरण: जासई उड्डाणपुलाचे आठ वर्षांपासून रखडलेले काम पूर्ण होण्यास २०२३ उजाडणार
उरण: जासई उड्डाणपुलाचे आठ वर्षांपासून रखडलेले काम पूर्ण होण्यास २०२३ उजाडणार

उरण : उरण ते पनवेल व नवी मुंबई यांना जोडणाऱ्या जासई येथील उड्डाणपुलाचे काम आठ वर्षांपासून रखडले असून येत्या मार्च २०२३ ला हा पूल प्रवासी वाहतुकीसाठी खुला केला जाणारा असल्याची माहिती भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या मार्गावरील प्रवासी व वाहतूकदार यांनी आनंद व्यक्त केला आहे.

उरण पनवेल व नवी मुंबई या मार्गावरून रोजची प्रवासी वाहतूक होत आहे. मात्र या मार्गावर उरण ते जासई तसेच गव्हाण फाट्यापासून पुढील रस्त्यांच्या रुंदीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र जासई नाका ते गव्हाण दरम्यानच्या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम मागील आठ वर्षे रखडले आहे. रस्त्याच्या कामामुळे जासई ते गव्हाण या दीड किलोमीटर च्या मार्गावर प्रवाशांना दररोज वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. यामध्ये नवी मुंबई, पनवेलला शिक्षणासाठी ये-जा करणारे विद्यार्थी,कामगार तसेच व्यावसायिक यांना देखील वाहतूक कोंडीमुळे त्रास सहन करावा लागत आहे.

हेही वाचा: नवी मुंबई: हॉटेलमध्ये घुसून सिनेस्टाईल मारामारी; दोघांना पोलिसांकडून अटक

या वाहतूक कोंडी मधून प्रवाशांची सुटका करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणा कडून जासई येथील दास्तान ते शंकर मंदीर असा १.२ किलोमीटर लांबीच्या उड्डाणपुलाची उभारणी करण्यात येत आहे. मात्र हा उड्डाणपूल मागील आठ वर्षापासून रखडला आहे. या उड्डाणपुलाच्या कामाच्या दरम्यान एक अपघात ही झाला होता. जासई उड्डाणपुलाचे काम येत्या मार्च २०२३ पर्यंत पूर्ण होणार अशी माहिती भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण(एनएचआय)चे अधिकारी यशवंत घोटकर यांनी दिली

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-11-2022 at 12:47 IST

संबंधित बातम्या