शिवस्मारकात पक्ष विरहित नोकर भरती करा जासई ग्रामपंचायतीची मागणी

जासई ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत दस्तान येथे लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या शिवस्मारकांची उभारणी केली आहे.

shivsmarak in uran
शिवस्मारकात पक्ष विरहित नोकर भरती करा जासई ग्रामपंचायतीची मागणी

उरण : जासई ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील दस्तान येथे असलेल्या शिवस्मारकातील नोकर भरतीत पक्ष विरहित नोकर भरती करुन स्थानिक प्रकल्पग्रस्त तरुणांना सामावून घेण्याची मागणी जासई ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष घरत यांनी जेएनपीए बंदर प्रशासनाकडे केली आहे. तसे न झाल्यास जेएनपीए विरोधात आंदोलन करण्याचाही इशारा त्यांनी दिला आहे.

 जासई ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत दस्तान येथे लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या शिवस्मारकांची उभारणी केली आहे. या शिवस्मारकांचे उध्दघाटन  डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या शुभे हस्ते करण्यात आले आहे. जेएनपीए प्रशासना कडून नेमण्यात आलेल्या कंत्राटदाराकडून या शिव स्मारकांच्या देखरेखीसाठी, कामकाजासाठी नोकर भरती केली जात आहे. यामध्ये ठराविक पक्षातील तरुणांनाच नोकर प्रक्रियेत सामावून घेतले जात आहे.त्यामुळे इतर पक्षांतील तरुणांवर, प्रकल्पग्रस्तांवर अन्याय होत आहे.

हेही वाचा >>> बोकडवीरा ते शेवा उड्डाणपूल अंधारात सिडकोच्या विद्युत विभागाचे दुर्लक्ष

लोकनेते दि.बा.पाटील यांनी या परिसरातील प्रकल्पांमधील नोकर भरती प्रक्रियेत केव्हाच राजकारण केले नाही.त्यामुळे त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शिव स्मारकातील नोकर भरती प्रक्रियेत सर्वच पक्षांच्या तरुणांना, प्रकल्पग्रस्तांना विश्वासात घेऊन सामावून घेण्याची मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात जेएनपीए बंदराचे चेअरमन संजय शेठी,व्हा.चेअरमन उमेश वाघ तसेच प्रशासकीय अधिकारी जयवंत ढवळे यांनी संबंधित ठेकेदाराला दिले असताना त्या सुचनेची अंमलबजावणी मुजोर ठेकेदार करत नसल्याने अनेक प्रकल्पग्रस्तांवर अन्याय आहे. या अन्यायाविरुद्ध विरोधात जेएनपीए बंदर प्रशासनावर आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-03-2023 at 20:22 IST
Next Story
बोकडवीरा ते शेवा उड्डाणपूल अंधारात सिडकोच्या विद्युत विभागाचे दुर्लक्ष
Exit mobile version