JNPT Port to Mumbai water service will be started from Bhaucha Dhakka instead of Gateway from 1st to 4th December | Loksatta

जेएनपीटी लाँच सेवा गेट वे ऐवजी भाऊच्या धक्क्यावरून; ‘नेव्ही डे’साठी चार दिवस गेटवे धक्का बंद

जेएनपीटी ते मुंबई ही जलसेवा आहे. ती पावसाळ्यात जून ते सप्टेंबर चार महिने भाऊचा धक्का तर सप्टेंबर ते मे या महिन्यात जेएनपीटी ते गेट वे ऑफ इंडिया अशी सुरू असते.

जेएनपीटी लाँच सेवा गेट वे ऐवजी भाऊच्या धक्क्यावरून; ‘नेव्ही डे’साठी चार दिवस गेटवे धक्का बंद
जेएनपीटी लाँच सेवा गेट वे ऐवजी भाऊच्या धक्क्यावरून

जेएनपीटी बंदर ते मुंबई (गेट वे ऑफ इंडिया) ही जलसेवा १ ते ४ डिसेंबर दरम्यान गेटवे ऐवजी भाऊचा धक्का येथे लागणार आहे. व भाऊचा धक्का ते जेएनपीटी असा प्रवास करणार आहे. गेट वे परिसरात चार दिवस नौदल डे साजरा केला जाणार आहे. त्यामुळे जेएनपीटी वरून गेट वे ऑफ इंडिया येथे जाणारी प्रवासी बोट चार दिवस भाऊच्या धक्यावर जाईल व तेथूनच जेएनपीटीला येईल. अशी माहिती जेएनपीटी वाहतूक विभागाने दिली आहे.

हेही वाचा- नेरुळमध्ये शिवाजी चौकाचा कायापालट; सिंहासनारुढ शिवरायांच्या पुतळ्याचे आकर्षण…

जेएनपीटी ते मुंबई ही जलसेवा आहे. ती पावसाळ्यात जून ते सप्टेंबर चार महिने भाऊचा धक्का तर सप्टेंबर ते मे या महिन्यात जेएनपीटी ते गेट वे ऑफ इंडिया अशी सुरू असते. या बोटीतून जेएनपीटी बंदरातील कामगार,कुटुंबीय तसेच इतर नागरिक ही दररोज प्रवास करतात. उरण जेएनपीटी ते दक्षिण मुंबई या एक तासांचा प्रवास आहे. मात्र जेएनपीटी व्यतिरिक्त नागरिकांना हा प्रवास महागाचा पडतो. तर जेएनपीटी कामगारासाठी मोफत आणि त्यांच्या कुटुंबियांना अल्पदरात हा प्रवास करता येतो. या जलमार्गावर जेएनपीटी मधील खाजगी बंदरातील कामगार ही प्रवास करतात. या सेवेसाठी जेएनपीटी कामगार वसाहत ते जेएनपीटी धक्का अशी स्वतंत्र बस सेवा ही आहे. त्याचप्रमाणे विना अडथळा मुंबईत प्रवास करता येत असल्याने या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-12-2022 at 19:21 IST
Next Story
नवी मुंबई: कोपरखैरणे भाजी मंडई वापरावीना ओस