पनवेल : कामोठे परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून गढूळ, पिवळसर आणि दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. यामुळे त्रस्त नागरिकांनी कामोठे कॉलनी फोरमच्या नेतृत्वात आंदोलन करण्याची तयारी केली असून या संदर्भातील निवेदन गुरुवार, ४ जून रोजी सिडको प्रशासनाला देण्यात आले.

कामोठे शहरातील विविध सेक्टरमधील नागरिकांकडून गेल्या काही दिवसांपासून दूषित पाणीपुरवठ्याचाचत मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त होत आहेत. अनेक भागांत नळातून येणारे पाणी गढूळ आणि पिवळसर असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. काही रहिवाशांनी साठवून ठेवलेल्या पाण्याचे छायाचित्रे आणि व्हिडीओही समोर आले असून त्यामध्ये गाळ व इतर अशुद्ध घटक दिसून येत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर कामोठे कॉलनी फोरमच्या पदाधिकाऱ्यांनी सिडको पाणीपुरवठा विभागाचे साहाय्यक कार्यकारी अभियंता प्रशांत चहारे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. पाणीपुरवठा यंत्रणेची तातडीने तपासणी करून विविध सेक्टरमधील सोसायट्यांमधून पाण्याचे नमुने घेण्यात यावेत आणि ते सरकार मान्यताप्राप्त प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. तसेच तपासणी अहवाल सार्वजनिक करावा आणि दोषी अधिकारी किया कंत्राटदारांवर कारवाई करावी, अशीही मागणी करण्यात आली.

कामोठे कॉलनी फोरमचे अध्यक्ष मंगेश अढाव यांनी सांगितले की, नागरिक नियमितपणे पाणीपट्टी भरत असताना त्यांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळत नसणे ही गंभीर बाब आहे. दूषित पाण्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीयनि पाहण्याची आवश्यकता आहे. दरम्यान, शहराला अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने अनेक नागरिकांना टँकरवर अवलंबून राहावे लागत असून त्यासाठी आर्थिक भार सहन करावा लागत असल्याची तक्रारही बैठकीत करण्यात आली.

पाण्यांच्या नमुन्यांची तपासणी सुरू

सिडकोचे साहाय्यक कार्यकारी अभियंता प्रशांत चाहरे यांनी नागरिकांना सांगितले की, काही भागांमध्ये पाण्याचा रंग पिवळसर दिसत असला तरी सिडकोकडून नियमितपणे पाण्याच्या नमुन्यांची तपासणी केली जाते. या तपासणीमध्ये संबंधित पाणी पिण्यास योग्य असल्याचे निष्पन्न झाले आहे. मात्र, काही सोसायठांमध्ये अद्याप गढूळ पाणी येत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी मांडल्यानंतर सिडकोने त्याबी दखल घेतली आहे. संबंधित चार ते पाच सोसायटचांचे पत्ते घेण्यात आले असून, त्या ठिकाणांहून पाण्याचे नमुने घेऊन त्यांची तपासणी केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.