scorecardresearch

नवी मुंबई: भाडेकरू म्हणून अर्ज केला निघाली घुसखोर बांगलादेशी

हे काम पोलिसांचा गोपनीय विभाग करतो. या ठिकाणी काम करणारे पोलीस नाईक सचिन केकरे यांना सदर महिलेबाबत संशय आला.

नवी मुंबई: भाडेकरू म्हणून अर्ज केला निघाली घुसखोर बांगलादेशी
प्रातिनिधिक फोटो- लोकसत्ता

घर भाड्याने देताना पोलीस एनओसी अर्थात ना हरकत प्रमाणपत्र किती महत्वाचे आहे हे सीउड येथे घडलेल्या प्रकारावरून अधोरेखित झाले आहे. भाड्याने घर देताना घर मालकाने दिलेल्या ना हरकत कागदपत्रात पोलिसांना महिला भाडेकरूचा संशय आला आणि तपासात हि महिला भारतीय नसून दिड वर्षापासून बेकायदा राहणारी बांगलादेशी असल्याचे समोर आले. तिच्या विरोधात पारपत्र कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. डोलीना साहेब खान असे आरोपी महिलेचे नाव आहे.

हेही वाचा >>> बुधवारी संध्याकाळी नवी मुंबईत पाणीपुरवठा बंद ;पाणी जपून वापरा

हि महिला मूळ बांगलादेशाची रहिवासी असून मागील दिड वर्षापासून ती नवी मुंबई परिसरात मोलकरणीच्या कामावर स्वतःचा  उदरनिर्वाह करते. करावे गावातील नितीन पाटील यांच्या एका खोलीत भाडेकरू म्हणून खान हि राहण्यास आली होती. त्यामुळे तिला घर भाड्याने देण्याबाबत पोलिसांना माहिती देण्यासाठी सर्व कागदपत्र एनआरआय पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले होते.

नवी मुंबई: सहनिबंधक कार्यालयात घराची नोंदणी न करणे पडले महागात; दोन जणांविरोधात गुन्हा दाखल

हे काम पोलिसांचा गोपनीय विभाग करतो. या ठिकाणी काम करणारे पोलीस नाईक सचिन केकरे यांना सदर महिलेबाबत संशय आला. त्यामुळे त्यांनी या महिलेचे मूळ गाव कुठले अशी विचारणा करावी असे घर मालक निळकंठ पाटील यांना सांगितले. त्यांनीही गोड बोलून माहिती घेतल्यावर सदर महिला बांगलादेशी असल्याचे समोर आले. त्यामुळे पोलीस पथक पाटील यांनी भाड्याने दिलेल्या सदनिकेत पोहचले. त्या ठिकाणी महिलेची चौकशी केली असता तिने केवळ आधारकार्डची सत्यप्रत (झेरोक्स) दाखवली मात्र मूळ आधारकार्ड हरवल्याचे तिने सांगितले.या सत्यप्रत नुसार ती नालासोपारा येथील रहिवासी असल्याचे नमूद होते. मात्र हे आधारकार्ड बनावट असल्याचा संशय आल्याने  तिला २४ जानेवारी पर्यत मूळ कागदपत्रे देण्याची मुदत देण्यात आली मात्र तिने जमा न केल्याने तिला पोलीस ठाण्यात बोलवून सखोल चौकशी केली असता राहणार विष्णुपुर पोस्ट माधवपाषा जिल्हा नोराइल ठाणे कालिया देश बांगलादेश अशी तिची पूर्ण माहिती समोर आली. तिच्या विरोधात विदेशी नागरिक कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-12-2022 at 19:31 IST

संबंधित बातम्या