scorecardresearch

उरण ते खारकोपर रेल्वे मार्गाची प्रतिक्षा संपणार? शनिवारी सुरक्षा तपासणी होणार

उरण स्थानकातील पॉवर हाऊस व यार्डाची ही काम वेगाने सुरू आहे

उरण ते खारकोपर रेल्वे मार्गाची प्रतिक्षा संपणार? शनिवारी सुरक्षा तपासणी होणार
उरण ते खारकोपर रेल्वे मार्ग

जगदीश तांडेल उरण :
सत्तावीस वर्षे प्रतिक्षेत असलेला बहूचर्चित खारकोपर ते उरण हा लोकलचा रेल्वे मार्ग मार्च अखेर पर्यंत सुरू होणार आहे. त्यासाठी शनिवारी( ४ )व सोमवार ( ६) मार्चला रेल्वे सुरक्षा आयुक्त  या मार्गाची पाहणी करणार आहेत. या मार्गावरील उरण,द्रोणागिरी(बोकडविरा),न्हावा- शेवा(नवघर),रांजणपाडा व गव्हाण(जासई) ही मार्गावरील स्थानके पूर्णत्वास जात आहेत.

हेही वाचा >>> नवी मुंबई : एपीएमसीत हापुस निर्यातीला सुरुवात

येथील प्लॅटफॉर्म, वाहनतळ,तिकीट घर आदींची कामेही रात्रंदिवस सुरू आहेत. त्याचप्रमाणे उरण स्थानकातील पॉवर हाऊस व यार्डाची ही काम वेगाने सुरू आहे.  उरण ते खारकोपर प्रकल्पाचे काम लवकरच पूर्ण होईल अशी माहीती मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकारी पी. डी. पाटील यांनी दिली. तर उरण ते खारकोपर हा मार्ग सुरू झाल्या नंतर हा कॉरिडॉर पूर्ण होईल आणि उरणला सीएसएमटीशी जोडले जाईल. त्यामुळे उरण ते सीएसएमटी असा प्रवास येथील प्रवाशांना करता येणार आहे.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-03-2023 at 23:41 IST
ताज्या बातम्या