नवी मुंबई : दुपारी बारा एक म्हणजे काही पीक हवर नाही मात्र याही वेळेस नवी मुंबईतील कोपरखैरणे ते वाशी या रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. अवेळी झालेल्या या वाहतूक कोंडीने वाहतूक पोलिसही अचंबित झाले. आणि जराशा विश्रांतीच्या वेळी वाहतूक नियंत्रित करण्यासाठी पोलीस रस्त्यावर दिसु लागले.नवी मुंबई शहरांतर्गत दोन्ही बाजूला सर्वात व्यस्त मार्ग कोपरखैरणे वाशी समजला जातो. सकाळी आठ ते अकरा साडे अकरा आणि संध्याकाळी सात ते साडे नऊ दहा पर्यंत मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. अन्य वेळी सुटसुटीत रस्ता असतो.

मात्र गुरुवारी अकरा नंतर कोपरखैरणेतुन वाशी कडे जाणाऱ्या मार्गावर सेक्टर १५ चा नाका ते ब्ल्यू डायमंड चौक या सुमारे एक किलोमीटरच्या पट्ट्यात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. हा सुमारे एक किलोमीटर रस्ता पार करण्यास सुमारे पाऊण तास लागला अशी माहिती निरंजन जाधव या वाहन चालकाने दिली. लवकरच वाहतूक पूर्ववत होईल असे तैनात असलेल्या वाहतूक पोलिसाने सांगितले.

हेही वाचा : उरण मध्ये जोरदार पावसाची हजेरी

या बाबत वाहतूक पोलीस निरीक्षक उमेश मुंढे यांच्याशी संपर्क साधला असता कुठेही मोठा अपघात झाला नाही वा कोणी महत्वाचे व्यक्ती येणार म्हणून वाहतूक थांबवली, किंवा सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला असला कुठलाही प्रकार झाला नाही. असे त्यांनी सांगितले.तसेच कोंडीची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस तैनात करण्यात आले आहेत. कदाचित एखादा छोटा अपघात झाला असावा त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी अद्याप कायम असावी अंदाज त्यांनी व्यक्त केला.