बोंबला! त्याचं चोराने परत मारला कोपरखैरणे विभाग कार्यालयात डल्ला; पोलिसांचे भयही उरले नाही|koparkhairane division office navi mumbai stolen by the same thief for the second time crime police | Loksatta

बोंबला! त्याचं चोराने परत मारला कोपरखैरणे विभाग कार्यालयात डल्ला; पोलिसांचे भयही उरले नाही

कोपरखैरणे विभाग कार्यालयात कार्यालय सुरू असताना एक युवक आला आणि सर्वांच्या देखत त्याने दोन संगणकाचे सीपीयू उघडून आतील प्रोसेसर घेऊन गेला.

बोंबला! त्याचं चोराने परत मारला कोपरखैरणे विभाग कार्यालयात डल्ला; पोलिसांचे भयही उरले नाही
बोंबला! त्याचं चोराने परत मारला कोपरखैरणे विभाग कार्यालयात डल्ला; पोलिसांचे भयही उरले नाही

नवी मुंबई : कार्यालय असो वा घर एकदा चोरी झाली की निदान काही महिने तरी कमालीची सतर्कता बाळगण्यात येते. मात्र नवी मुंबईतील कोपरखैरणे नोड मनपा विभाग कार्यालय याला अपवाद ठरले आहे. एक चोरी होऊन महिनाही उलटला नाही तोच तिथे दुसरी चोरी झाली. तरीही कोणाला सोयर ना सुतक असा अविर्भाव दिसत आहे.

कोपरखैरणे विभाग कार्यालयात कार्यालय सुरू असताना एक युवक आला आणि सर्वांच्या देखत त्याने दोन संगणकाचे सीपीयू उघडून आतील प्रोसेसर घेऊन गेला. एवढ्यावर न थांबता तो दुसऱ्या मजल्यावर जाऊन असाच एक संगणक उघडला व त्यातील प्रोसेसर घेऊन गेला आणि याही वेळेस तसेच झाले. शुक्रवारी तोच युवक आला आणि त्याने सीपीयू उघडून आतील प्रोसेसर घेऊन गेला. जेव्हा सोमवारी नियमित कामासाठी संबंधित कर्मचाऱ्याने संगणक सुरू करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी ही बाब उघडकीस आली आणि धावपळ सुरू झाली. चोर सीसीटीव्हीत स्पष्ट दिसूनही पोलिसांनी न शोधल्याने सापडला नाही. यामुळे तो निर्ढावला आणि त्याने चोरी केली. विभाग कार्यालयात कोणाला काहीही पडलेले नाही अशी संतप्त प्रतिक्रिया येथे पाणी देयक भरण्यास आलेल्या शेख शकील यांनी व्यक्त केली.शुक्रवारी चोरी झाली असून ही बाब सोमवारी लक्षात आली . या बाबत कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे अशी माहिती विभाग अधिकारी प्रशांत गावडे यांनी दिली.

हेही वाचा: नवी मुंबई: वाहनचालकांचे वेगावर नियंत्रण राहण्यासाठी महापालिकेने लढवली अनोखी शक्कलहेही वाचा:

या ठिकाणी चोवीस तास सुरक्षा रक्षक तैनात असूनही दोन वेळा त्याच चोराने चोरी केली. त्यामुळे सुरक्षा रक्षकांच्या कार्यशैली वर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे. चोरी झाली तेव्हा सुरक्षा रक्षक जागेवर नसल्याने त्या सुरक्षा रक्षकाची कार्यालयांतर्गत चौकशी करीत असताना वर पाणी सोडण्यासाठी पाण्याची मोटर सुरू करण्यासाठी गेलो होतो ” असे कारण सांगितले अशी माहिती एका कर्मचाऱ्याने दिली.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-12-2022 at 13:25 IST
Next Story
दारूचे व्यसन नडले, उच्च दाबाच्या विद्युत खांबाला दोरी बांधून तरूणाची आत्महत्या