नवी मुंबई शहराला स्वच्छतेत देशात तिसरा क्रमांक मिळाला असून दुरीकडे मुंबई व महाराष्ट्राला जोडणाऱ्या सायन पनवेल मार्गावरील पालिका हद्दीतील दिवाबत्तीची लुकलुक सातत्याने  अपघाताला आमंत्रण देत होती. अपुऱ्या विजव्यवस्थेमुळे व महामार्गावरील अनेक बंद दिव्यांमुळे पालिकेला सातत्याने नवी मुंबई शहरातून जाणाऱ्या मार्गावरील पथदिवे बंद असे आरोप होत असल्याने पालिकेची बदनामी होत असे.पालिकेने याच महामार्गावरील एलईडी पथदिव्यांसाठीचे काम करण्यात येत असून महिनाभरात या मार्गावरील काम पूर्ण केले जाणार असून नव्या वर्षात पालिका हद्दीतील महामार्गावर एलईडी पथदिव्याचा प्रकाश पडणार असल्याची माहिती पालिका विद्युत विभागाने दिली. आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> नवी मुंबई : अपघातास कारणीभूत ठरणारे उरणच्या चारफाटा चौकातील फलक हटविण्याची मागणी

पालिका महामार्गावरील पथदिव्यांच्या दुरुस्ती व देखभालीसह  नवीन एलईडी दिवे लावण्याचे  १०.५४ कोटींचे काम  केले जात  असून याच्या  कामाला  वेगात सुरवात करण्यात आली आहे. नवी मुंबई हद्दीतून जाणाऱ्या  महामार्गावरील वाशी टोल नाका ते सी.बी.डी. बेलापूर हा भाग नवी मुंबई महानगरपालिका हद्दीत येत असून सदर मार्गाची मालकी शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असल्याने व  त्याकडे पुरेसे लक्ष दिले जात नसल्याने त्याच्या दूरवस्थेविषयी ,सततच्या दिवाबत्तीविषयी प्रवाशी, नागरिकांकडून नवी मुंबई महानगरपालिकेस दोष दिला जात होता. याचा परिणाम नवी मुंबई शहराच्या स्वच्छ व सुंदर प्रतिमेवर सातत्याने  होत असे.  या महामार्गावरील  ९ डिसेंबर २०२१ ला पालिकेकडे दिवाबत्ती हस्तातंरीत करण्यात आल्यानंतर  पालिकेकडून हस्तांतरीत करण्यात आलेल्या दिवाबत्तीच्या कामासाठी १०.५४  कोटी खर्चातून महामार्गावरील एलईडी दिवाबत्ती लावली जात आहे. संबंधित ठेकेदाराने वेगात  कामाला सुरवात केली असून  असून पालिकेने या मार्गावरील सुरवातीला महमार्गावरील अंधार दूर करण्यासाठी ६२८ बंद दिव्यांची दुरुस्ती केली आहे.

हेही वाचा >>> नवी मुंबई: लिडार सर्वेक्षण पुर्ण न झाल्याने पालिकेचे मालमत्ता कर वसुलीचे लक्ष ८०० कोटींवरुन ६०० कोटींवरच अडणार

सहशहर अभियंता शिरीष आरदवाड व कार्यकारी अभियंता सुनील लाड यांच्या प्रयत्नातून कामाला वेगाने सुरवात करण्यात आली आहे.. पालिकेने प्रथम महामार्गाचा सर्व्हे करुन बंद दिवे दुरुस्त करुन घेतली आहेत तसेच महामार्गावरील धोकादायक व खराब झालेले पथखांब काढून घेतलेअसून  विविध भागात ट्रान्सफार्मर बदलण्यात आले  असून नव्आयाने केबल टाकण्यात आली आहे. नववर्षात याच  मार्गावर पालिका सर्व पथदिवे एलईडीचे लावणार असून त्यातून  वीजबचत होणार असून सातत्याने महामार्गावर होणारी पथदिव्यांची डोळेमिचकावणी बंद होणार आहे.  दिवाबत्ती  हस्तांतरित  करण्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने ८ कोटी २९ लाखांची रक्कम पालिकेने प्रदान केली होती. एमएसआरडीसीच्या बेलापूर ,नेरुळ वाशी येथील उड्डाणपुलावील दिवाबत्तीची व्यवस्थाही भविष्यात पालिकेला हस्तांतरीत करुन घ्यावी लागेल अथवा. रस्ते उजेडात उड्डाणपुल अंधारात अशी स्थिती होण्याची शक्यता आहे. एलईडी लावण्यासाठी मे . रॉयल पॉवर टेक या कंपनीला या कामाचे कार्यादेश दिले असून एलईडी फिटींग लावण्याबरोबरच ५ वर्षाची देखभाल दुरुस्तीही संबंधित ठेकेदाराला दिली आहे. या मार्गावरील एलईडी फिटींगमुळे  महिना वीजबिलात ९४ लाखाची बचतही होणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हस्तांतरीत करण्यात आलेल्या दिवाबत्तीच्या खांबांवरील जाहिरातीचे अधिकारही पालिकेला मिळण्यासाठी पालिका प्रयत्नशील आहे. सायन पनवेल महामार्गावर नवी मुंबई महापालिका हद्दीत एलईडी पथदिवे लावण्याचे काम सुरु असून ३१ डिसेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली असल्याची माहिती सह शहर अभियंता, शिरिष आरदवाड यांनी दिली.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Led streetlights on sion panvel highway passing through the navi mumbai municipal corporation zws
First published on: 08-12-2022 at 17:55 IST