नवी मुंबई महापालिकेने यंदा २०२२-२३ या आर्थिक वर्षात मालमत्ता करातून अंदाजे ८०० कोटी रुपये महसुल प्राप्त होणार असल्याचा अंदाज तत्कालीन पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी व्यक्त केला होता. या आर्थिक वर्षामध्ये लिडार सर्वेक्षणामुळे मालमत्ताकर वसुलीत २०० कोटी रुपंयाची भर पालिकेच्या तिजोरीत पडण्याची शक्यता होती.परंतू लिडार सर्वेक्षण पुर्ण न झाल्याने यंदा पालिकेचे मालमत्ता कर वसुलीचे लक्ष ६०० कोटीवर असून आतापर्यंत ३०० कोटी वसुल झाले आहेत. गेल्यावर्षी अभय योजना होती. त्यामुळे नोव्हेंबरपर्यंत वसुली ३०५ कोटी होती परंतू यंदा अभय योजना नसतानाही पालिकेने आजमितीला ३०० कोटी मालमत्ताकराची चांगली वसुली केली आहे.

पालिकेने आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सहामाही मध्ये मालमत्ता देयक हे मालमत्ता कर धारकांना पाठवण्यात आले आहेत. नवी मुंबई पालिकेच्या मालमत्ता कराच्या संकलनेनुसार सव्वातीन लाख मालमत्ता असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे लिडार सर्वेक्षण पुर्ण झाल्यावर या संख्येत आणखी जवळजवळ दीड लाख बिलांची भर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे पालिकेला लिडार सर्वेक्षण पुर्ण झाल्यांनतर २०० कोटी रुपयांची मालमत्ता कर वसुली वाढणार आहे. पण या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाही मध्ये लिडार सर्वेक्षणांचे काम पुर्ण होणार होते. पण हे काम पुर्ण झाले नाही. त्यामुळे मालमत्ता कर वसुली ६०० कोटींच होईल असे चित्र आहे.

A 16 year old girl was raped by five people Nagpur
नागपूर: १६ वर्षीय मुलीवर पाच जणांचा बलात्कार
bank of Maharashtra loan disbursement increased by 16 percent
‘महाबँके’च्या कर्ज वितरणात १६ टक्क्यांची वाढ
380 crore fraud case
३८० कोटी फसवणूक प्रकरण : आरोपीचा तीन राज्यांमध्ये १२ दिवस पाठलाग, अखेर उत्तराखंड येथून अटक
House Taddeo
ताडदेवमधील साडेसात कोटींच्या घराची विक्री नाही, ‘म्हाडा’ची गेल्यावर्षीची सोडत, ४०८२ पैकी केवळ २७२६ घरांची विक्री

हेही वाचा: नवी मुंबई : फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांचे किरीट सोमय्यांना साकडे; सोमय्यांनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट

लिडार सर्वेक्षण व त्याच्या सध्यस्थितीमधील कामाबाबत पालिका आयुक्त नार्वेकर यांच्या उपस्थितीत बैठकही झाली आहे. नवी मुबई महापालिका मालमत्ता कर विभागाने नवी २०२१-२२ आर्थिक वर्षात नवी मुंबई महानगरपालिका ६०० कोटींचे लक्ष ठेवून ५६३ कोटीची वसुली केली होती. यावर्षी २०२२-२३ या वर्षातील पहिल्या ६ महिन्यात पालिकेने गेल्यावर्षी पेक्षा १५ कोटी अधिक वसूल केले आहेत. गेल्यावर्षी सप्टेंबर २०२१ पर्यंत १९५ कोटी वसूल केले होते.परंतु यंदा हिच वसुली पहिल्या सहा महिन्यात १५ कोटी अधिक म्हणजेच २१० कोटी झाली असून सध्या वसुली ३०० कोटीपर्यंत पोहचली आहे. यंदा पालिकेने या वर्षाअखेरीस ८०० कोटी मालमत्ता कर वसुलीचे लक्ष लिडार सर्वेक्षणाच्या भरवशावर ठेवले होते पण काम अपूर्ण असल्याने २०२३-२४ साठी पालिकेचे लक्ष ८०० कोटीपेक्षा अधिक ठेवले जाण्याची शक्यता आहे.

लिडार सर्वेक्षणांचे काम हे सुरु असून पुढील वर्षाच्या २०२३-२४ आर्थिक वर्षात नवीन मालमत्ता कर धारकांना देयक पाठवण्यात येतील. त्यामध्ये मालमत्ता बिलांची संख्याही निश्चित वाढेल अशी शक्यता आहे.तर गत आर्थिक वर्षाच्यात तुलनेत यंदा आतापर्यंत पालिकेने अभय योजना नसतानाही जवळजवळ ३०० कोटीपर्यंतची वसुली केली आहे. मार्चपर्यंत ६०० कोटीपर्यंतचे लक्ष पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. -सुजाता ढोले, अतिरिक्त आयुक्त नवी मुंबई महापालिका

हेही वाचा: अपुऱ्या मनुष्यबळाने रेल्वे सुरक्षेवर ताण! २६ लाख प्रवाशांसाठी केवळ ८१ रेल्वे पोलीस तैनात

मागील काही आर्थिक वर्षात पालिकेने केलेली मालमत्ताकर वसुली

वर्ष मालमत्ता कर वसुली
२०१८-१९ – ४८१.४० कोटी
२०१९-२० – ५५८.९१ कोटी
२०२०-२१ – ५२७.८१ कोटी
२०२१-२२ – ५६२ कोटी
२०२२-२३ – ३०० कोटी (नोव्हेंबर २०२२ पर्यंत )