फसवणुकीच्या भीतीपोटी धोकादायक इमारतीत वास्तव्य

इमारत अतिधोकादायक असतानाही काही रहिवासी घरे रिकामी करीत नसल्याने महापालिका प्रशासनाने मागील आठवडय़ात त्यांचे वीज व पाणी बंद केले.

घरांचे करारनामे देण्याची वाशीतील श्रद्धा सोसायटीतील रहिवाशांची मागणी 

नवी मुंबई : इमारत अतिधोकादायक असतानाही काही रहिवासी घरे रिकामी करीत नसल्याने महापालिका प्रशासनाने मागील आठवडय़ात त्यांचे वीज व पाणी बंद केले. त्यानंतर काही जणांनी घरे रिकामी केली तर काही जण अशा परिस्थितीतही राहत आहेत. त्यांनी जनरेटरच्या विजेवर व बाटलीबंद विकतचे पाणी घेऊन राहणे पसंत केले आहे. घरे रिकामी केल्यास फसवणुकीची भीती असल्याने त्यांनी आधी पुनर्विकासातील घरांचे करारनामे लेखी स्वरूपात देण्याची मागणी केली आहे.

शहरातील मध्यवर्ती असलेल्या वाशी येथील श्रद्धा सोसायटीमध्ये ३६८ कुटुंब राहत होती. मात्र इमारत धोकादायक झाल्याने यातील अनेकांनी घरे रिकामी केली होती. मात्र ५२ कुटुंबांनी धाकादायक इमारतीत राहणे पसंत केले होते. त्यामुळे पुनर्विकास रखडला होता. परंतु न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिका प्रशासनाने धोकादायक इमारतीमधील वीज व पाणीपुरवठा खंडित केला आहे. तरीदेखील आमच्या हक्काचे घर आम्हाला मिळाले पाहिजे व आमची फसवणूक होऊ  नये यासाठी ‘करारनामा दिला तरच घरे खाली करणार’ असा पवित्रा येथील कुटुंबांनी घेतला होता. सोसायटीतील १९९८ मध्ये २३ पैकी सात इमारती धोकादायक म्हणून घोषित झाल्या व तेथूनच पुनर्विकासाची चर्चा सुरू झाली होती. ३६८ पैकी १८५ घरमालकांनी सह्य केल्या नव्हत्या. मात्र आता पालिकेने  या सोसायटीचे वीज व पाणी बंद केले आहे. मात्र आम्हाला विचारात न घेता वीज व पाणीपुरवठा खंडित केल्याचा आरोप रहिवासी करीत आहेत.

आम्हाला कोणत्याही प्रकारचा लेखी करारनामा दिला नसल्याने वीज व पाणीपुरवठा खंडित केल्यानंतरही आम्ही जनरेटरच्या साहाय्याने वीजपुरवठा व विकतच्या बाटली बंद पाण्याचा वापर करून येथे राहत आहोत. पुनर्विकासात आमची फसवणूक होण्याची शक्यता आहे. आम्हाला लेखी करारनामा द्यायलाच हवा.

 –सुनील अहिरराव, स्थानिक रहिवाशी, श्रध्दा सोसायटी

नागरिकांना धोकादायक घरात राहून जीव धोक्यात घालण्यापेक्षा नवीन घरे बांधून मिळवण्यासाठी घरे रिकामी करावीत. न्यायालयाच्या निर्देशानुसार पालिकेने येथे वीज पाणी खंडित करण्याची कारवाई केली आहे. बहुतांश नागरिकांनी घरे रिकामी केली असून पुनर्विकासात नागरीकांना हक्काची नवीन घरे बांधून मिळणार आहेत.

 –किशोर पाटकर, माजी  नगरसेवक

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नवी मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Living dangerous building cheated ysh

Next Story
मलेरिया, डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज
ताज्या बातम्या