scorecardresearch

पनवेलच्या इतिहास-वर्तमान-भविष्याचा वेध; ‘पनवेलायन’ कॉफीटेबल बुकचे प्रकाशन

वाशीचा खाडीपूल अस्तित्वात नव्हता तेव्हा परगावातून येणाऱ्यांसाठी पनवेल ही मुंबई जवळ आल्याची खूण होती.

‘पनवेलायन’ कॉफीटेबल बुकचे प्रकाशन

पनवेल : शिवकालीन स्वराज्यापासून परकीय राजवटींत व्यापारिक, सामरिकदृष्टय़ा महत्त्वाचे मानले जाणारे बंदर, स्वातंत्र्योत्तर काळात मुंबईचे प्रवेशद्वार असलेले शहर आणि होऊ घातलेल्या विमानतळामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचणारे महानगर.. गेल्या पाचेकशे शतकांत अशी स्थित्यंतरे अनुभवणारे पनवेलसारखे शहर क्वचितच आढळेल.

अनेक बदल होऊनदेखील दळणवळण केंद्र म्हणून असलेली आपली ओळख कायम ठेवणाऱ्या पनवेलच्या या स्थित्यंतरांचा आढावा घेणारे ‘पनवेलायन’ हे कॉफीटेबल बुक ‘लोकसत्ता’तर्फे प्रकाशित केले जाणार आहे.

वाशीचा खाडीपूल अस्तित्वात नव्हता तेव्हा परगावातून येणाऱ्यांसाठी पनवेल ही मुंबई जवळ आल्याची खूण होती. पनवेलचे एसटी स्थानक हे तर खूप आधीपासूनच महत्त्वाचे प्रवासी वाहतूक केंद्र राहिले आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग म्हणून

ओळखला जात असला तरी तो सुरू होतो, पनवेलच्या हद्दीतूनच.

आता तर विरार-अलिबाग, दिल्ली-मुंबई अशा अनेक महत्त्वाच्या रस्ते प्रकल्पांतही हे शहर महत्त्वाचे केंद्र असणार आहे.

आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे तर या शहराला महानगराइतके व्यापक महत्त्व येणार आहे. या सर्व घडामोडींचा आढावा ‘पनवेलायन’ या कॉफी टेबलबुकमध्ये घेण्यात आला आहे.

सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी,

पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्यासह अनेक मान्यवरांनी ‘पनवेलायन’मधून दिशादर्शन केले आहे. मात्र,

 केवळ विकासाचे केंद्र म्हणूनच नव्हे तर क्रीडा, संस्कृती, संगीत, निसर्गसंपदा, पर्यटन अशा अनुषंगानेही पनवेलचे महत्त्व सांगणाऱ्या लेखांचा, छायाचित्रांचा या कॉफीटेबल बुकमध्ये समावेश असणार आहे.

पनवेलमध्ये पुढील

आठवडय़ात होणाऱ्या एका विशेष कार्यक्रमात या कॉफीटेबल बुकचे प्रकाशन करण्यात येणार आहे. तसेच याप्रसंगी पनवेलच्या एकंदरीत विकासावर चर्चा घडवून आणणारा परिसंवादही आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी केवळ निमंत्रितांनाच प्रवेश असणार आहे.

प्रायोजक

‘लोकसत्ता’कृत ‘पनवेलायन’ या कॉफीटेबल बुकचे सहप्रायोजक अधिराज कन्स्ट्रक्शन हे असून ‘पॉवर्डबाय’ सहकार्य एस. आर. रिसॉर्ट, पनवेल, जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्ट, जमीन प्रा. लि. यांचे लाभले आहे.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Look at the history present future panvel publication of coffee table book akp

ताज्या बातम्या