नवी मुंबई शहर झपाट्याने व वेगवान पध्दतीने वाढत असताना येथील जागांचे व घरांचे दर करोडोंच्यापटीत गेले आहे. नवी मुंबई शहरात झपाट्याने व वेगवान पध्दतीने वाढणाऱ्या सीवूड्स रेल्वेस्थानक परिसराला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे. भव्य मॉल व स्थानकाच्या दोन्ही बाजूला एल अन्ड टी कंपनीच्यावतीने सुरु असलेल्या गृहनिर्मिती प्रकल्पामुळे या परिसराला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले असताना दुसरीकडे गृहनिर्मिती प्रकल्प आकारास येत असून रात्रंदिवस या ठिकाणी बांधकाम सुरु असल्याच्या तक्रारी स्थानिक नागरीकांनी पालिका व पोलीस विभागाला दिल्या आहेत. तर दुसरीकडे य ठिकाणी बांधकामासाठी वापरण्यात येणारे सिमेंट मिक्सर रस्त्यावरच उभे असल्याने नागरिकांनी चालायचे तरी कुठून असा प्रश्न उपस्थित केला आहे. या गृहनिर्मिती प्रकल्पामुळे या परिस्थितीतील नागरिकांना मात्र अनेक नागरिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. दुसरीकडे पालिकेच्या नगररचना विभागाने या प्रकल्पाला दिवसरात्र कामाची परवानगी दिली असून आजुबाजूच्या सामान्य नागरीकांना पहाटे उठून मॉर्निंग वॉकला जाण्याचीही भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा >>>…तर माथाडी विधानभवनावर धडकणार, माथाडी नेते नरेंद्र पाटील यांचा इशारा

Dombivli, poultry farm, Kopar railway station
डोंबिवली जवळील कोपर रेल्वे स्थानकालगत हरितपट्ट्यात कोंबड्यांचा खुराडा, रेल्वे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी
uran potholes marathi news
उरण: खोपटे-कोप्रोली मार्गावर खड्ड्यांचे विघ्न कायम, एकाच ठिकाणी खड्डे कसे? प्रवाशांचा सवाल; कोट्यवधी रुपये खर्च करूनही दुरवस्था
Mumbai Coastal Road, Cracks Appear, Controversy Over Traffic Flow, Pedestrian Walkway, bmc, hajiali Pedestrian subway, Pedestrian subway flood in mumbai,
मुंबई : सागरी किनारा मार्गावरील मार्गिकांच्या संख्येवरून नवा वाद, आरोपाचे अधिकाऱ्यांकडून खंडन
Navi Mumbai, Escalating Traffic, traffic jam, airoli, belapur, Illegal Parking, traffic jam in Navi Mumbai, traffic jam belapur, traffic jam airoli, illegal parking in navi mumbai, marath news, two wheelar parking, four wheelar parking, navi mumbai citizens,
बेशिस्त पार्किंगमुळे वाहतुकीचा खोळंबा, वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे ऐरोलीपासून बेलापूरपर्यंत वाहनतळांची सुविधा अपुरी

नवी मुंबई शहर हे राहण्याच्यादृष्टीने महाराष्ट्रातील महत्वाचे शहर मानले गेले असून शहराची रचना तसेच पालिकेने केलेल्या सार्वजनिक सुविधा ,स्वच्छता ,नागरीकांना आवश्यक अत्यावश्यक नागरी सुविधांमुळे या शहराला राहण्यासाठी पसंती मिळताना पाहायला मिळते. त्यामध्ये नेरुळ व सीवूड्स परिसराला l दिवसेंदिवस अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. याच सीवूडस रेल्वेस्थानकाच्या पूर्व पश्चिम दिशेला एल अन्ड टी कंपनीच्यावतीने गृहनिर्मिती प्रकल्प सुरु आहे. या ठिकाणी घरांचे भाव करोंडोंच्या घरात आहे. परंतू या गृहनिर्मिती प्रकल्पाच्यामुळे सीवूड्स पूर्व व पश्चिम भागात रात्रभर काम चालू ठेवले जात असल्याचा व सातत्याने ध्वनीप्रदूषण व वायूप्रदूषण होत असल्याने पालिकेकडे तक्रार करुनही पालिका अधिकारी दुर्लक्ष करत असून नागरीक संतप्त सवाल करु लागले आहेत.

हेही वाचा >>>नवी मुंबई : काही क्षणात दुचाकी चोरी करणाऱ्याला अटक, २३ दुचाकी जप्त

रेल्वेस्थानकाच्या परिसरात अनेक वर्षापासून मोठे गृहनिर्मिती प्रकल्प आकारास येत असून या कामामुळे रेल्वेस्थानकाच्या दोन्ही दिशेला धुळीचे साम्राज्य असून सतत रस्त्यावर धुळ पाहायला मिळते. बांधकामामुळे रात्रभर कर्कश आवाज व गोंधळामुळे नागरीकांना अनेक मानसिक व शारीरीक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सकाळी पहाटे उठून मॉर्निंग वॉकला जावे तर रस्त्यावर मिक्सर, डंपरची गर्दी असते. याबाबत पालिकेने योग्य ती कार्यवाही करावी.-जयवंत कुलकर्णी स्थानिक नागरिक