नवी मुंबई : “शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे” आयोजित महाप्रबोधन यात्रा वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात गुरुवारी आयोजित करण्यात येणार आहे. या सभेला माजी मंत्री भास्कर जाधव,सचिव विनायक राउत उपनेते सुषमा अंधारे उपस्थित राहणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मान्यता दिल्या नंतर हि नवी मुंबईतील पहिलीच सभा आहे. अशी माहिती आजच्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.

हेही वाचा : पहिली बाजू : पूर्वग्रह संघाचे की टीकाकारांचे?

Ajit Pawar Amravati, Amravati Lok Sabha,
अजित पवार म्‍हणाले, “शेतकऱ्यांना मदत दिली नाही, तर चले जाव म्‍हणा”
Devendra Fadnavis always telling lies Criticism of Sushilkumar Shinde
रेटून खोटे बोलण्याचे फडणवीसांवर संस्कार; सुशीलकुमार शिंदे यांचा टोला
Eknath Shinde Speech in Nagpur
“बाळासाहेब ठाकरेंनी नितीन गडकरींना दिलं होतं टोपणनाव”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भाषणात सांगितला ‘तो’ किस्सा
Ganpat Gaikwad supporters support Shrikant Shinde in Kalyan East
कल्याण पूर्वेत गणपत गायकवाड समर्थकांचा श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा

एकनाथ शिंदे यांनी ४० आमदार घेऊन शिवसेना सोडली व आमचीच हि शिवसेना खरी असल्याचा दावा केला. यथावकाश आरोप प्रत्यारोप झाल्या नंतर निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाल चिन्हाला मान्यता दिली.  या नंतर जागोजागी महाप्रबोधन यात्रेचे आयोजन आदेश देण्यात आले. त्याच अनुशंघाने नवी मुंबईत या महाप्रबोधन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी संध्याकाळी ४ ते ७ दरम्यान हे प्रबोधन वाशीतील विष्णुदास भावे नाट्यग्रहात होणार आहे. या बाबत वाशीतील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली.

हेही वाचा : काळ्या वर्णाची मुलगी झाली म्हणून दोन वर्षांपासून जाच, शेवटी महिलेने पोलीस ठाणे गाठले; पनवेलमधील संतापजनक प्रकार

या प्रबोधन यात्रेत नवी मुंबईतील शिवसैनिकाचे प्रबोधन करण्यासाठी ठाणे जिल्हा खासदार राजन विचारे, माजी मंत्री भास्कर जाधव सचिव विनायक राउत उपनेते सुषमा अंधारे हे नेते येणार आहेत. यावेळी शिवसेनेची पुढची वाटचाल, उद्धव ठाकरे यांनी योजलेल्या योजना आदींची माहिती देण्यात येणार आहे. अशी माहिती बेलापूर मतदारसंघ अध्यक्ष विठ्ठल मोरे आणि ऐरोली मतदार संघ अध्यक्ष द्वारकानाथ भोईर यांनी दिली यावेळी शिवसेना महिला जिल्हाध्यक्ष रंजना सत्रे याही उपस्थित होत्या.यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेला मिळालेल्या मशाल चिन्ह बाबत आनंद व्यक्त करीत कार्यालयात मशाल पेटवून शिवसेनेचा जयघोष करण्यात आला.