scorecardresearch

महालक्ष्मी सरस प्रदर्शन बुधवारपासून वाशीत

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे.

Mahalakshmi Saras exhibition in Vashi from Wednesday
महालक्ष्मी सरस प्रदर्शन बुधवारपासून वाशीत

नवी मुंबई : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या वतीने (उमेद) नवीमुंबईत पहिल्यांदा वाशी येथील सिडको एक्झीबिशन सेंटर या ठिकाणी बुधवार दि. ८ ते १९ मार्च २०२३ या कालावधीत राज्यस्तरीय “महालक्ष्मी सरस प्रदर्शनचे आयोजन करण्यात येत आहे. अशी माहिती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत यांनी आज सिडको भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे. ग्रामीण भागातील महिलांना स्वयंसहाय्यता गटाच्या माध्यमातून संघटित करुन त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामीण क्रयशक्तीला बाजारपेठ मिळवून व्यवसायवृध्दी व्हावी असा या प्रदर्शनाचा उद्देश आहे. दरवर्षी मुंबईतील बांद्रा या ठिकाणी भरविण्यात येणारे महालक्ष्मी सरस प्रदर्शन यंदा नवी मुंबईत भरविण्यात येत  आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ८ मार्च २०२३ रोजी या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे.

हेही वाचा >>> आमदार मंदा म्हात्रे यांची महिलांसह नाचत गाजत होळी

महालक्ष्मी सरस प्रदर्शन एक अत्यंत नावीन्यपूर्ण आणि ग्रामीण संस्कृतीला शहरापर्यंत पोहोचविण्याचे अनोखे व्यासपीठ आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ३५० आणि देशभरातून साधारण ११९ स्टॉल येणार आहेत. प्रदर्शनात राज्याच्या कानाकोपन्यातून आलेल्या सुगरणींचे खमंग आणि रुचकर शाकाहारी व मांसाहारी खाद्यपदार्थांचे ७० स्टॉलचे मिळून भव्य असे फूड कोर्ट असणार आहे. याशिवाय महिलांच्या आकर्षणाच्या अनेक प्रकारच्या ज्वेलरी,लाकडी खेळणी, इतर राज्यातील दुर्मिळ वस्तूंची रेलचेल या प्रदर्शनात असणार आहे. आंतरराष्ट्रीय मीलेट (भरडधान्य) वर्ष लक्षात घेऊन स्वतंत्र मिलेट दालन यात असणार आहे. खात्रीचे आणि प्रमाणित असे सेंद्रिय पदार्थ शहरवासीयांना या प्रदर्शनात उपलब्ध होणार आहेत.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-03-2023 at 19:28 IST