नवी मुंबई : जनतेचा आपल्यावर असणारा विश्वास अधिक दृढ करून आगामी कालावधीत नवी मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवा हीच खरी बाळासाहेबांना जयंतीच्या निमित्ताने समर्पित केलेली आदरांजली असेल, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले.

बाळासाहेबांची शिवसेना नवी मुंबई जिल्हा यांच्यावतीने स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून ज्येष्ठ शिवसैनिकांचा सत्कार, पुनर्वसन योजनेतील लाभार्थ्यांना दस्तावेज वाटप, दिनदर्शिका प्रकाशन आणि पक्ष प्रवेश आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात करण्यात आले होते. यावेळी मंत्री केसरकर यांनी संवाद साधला.

Devendra Fadnavis always telling lies Criticism of Sushilkumar Shinde
रेटून खोटे बोलण्याचे फडणवीसांवर संस्कार; सुशीलकुमार शिंदे यांचा टोला
Proposal of friendly fight in Bhiwandi rejected by Congress seniors
भिवंडीत मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव काँग्रेसच्या वरिष्ठांकडून अमान्य
in Gadchiroli charmoshi taluka s Villagers Oppose Land Acquisition for Iron Project BJP Faces Backlash in Lok Sabha Campaign
भूसंपादनावरून संतप्त ग्रामस्थांकडून भाजपचे ‘बॅनर’ लावण्यास मनाई , प्रचारासाठी गेलेल्या कार्यकर्ते व नेत्यांनाही परत पाठवले
The seat sharing dispute in the Grand Alliance ends in two days
महायुतीमधील जागावाटपाचा तिढा दोन दिवसांत सुटेल; ३ मित्रपक्ष युतीधर्म पाळत नसल्याबद्दल शिंदे गटात नाराजी

हेही वाचा >>> उरण : मच्छिमारांमुळे जखमी फ्लेमिंगोला मिळालं जीवदान, पतंगाच्या मांज्याने दुखापत झाल्याची शंका

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात रोजगार बरोबरच विविध प्रकल्प व विकास कामांची गंगा अवतरली आहे. मागील २२ वर्षापासून घरांच्या पुनर्वसनाचा प्रश्न माजी नगरसेवक किशोर पाटकर यांच्या अखंडित पाठपुरामुळे मार्गी लागला आहे. नवी मुंबईत आगामी कालावधीत सिडको आणि मोडकळीस आलेल्या घरांचा प्रश्न मार्गी लागणार आहे, असा आशावाद मंत्री केसरकर यांनी व्यक्त केला. यावेळी मार्गदर्शन करताना उपनेते विजय नाहटा यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या माध्यमातून राज्यात आलेल्या नवनवीन योजनांची माहिती उपस्थिती त्यांना दिली तर आगामी कालावधीत नवी मुंबईकरांच्या समस्या देखील मुख्यमंत्री शिंदे यांच्या माध्यमातून मार्गी लागतील असा विश्वास व्यक्त केला. उपस्थितशी संवाद साधताना किशोर पाटकर यांनी २२ वर्षापासून नाकर्ते राज्यकर्त्यांच्यामुळे नवी मुंबईतील सिडको निर्मित कराचा प्रश्न रखडला होता परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून हा प्रश्न तातडीने मार्गी लागल्याबद्दल त्यांचे आभार मानले. नागरिकांना त्यांच्या हक्काच्या मिळालेले घर हीच खरी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अर्पण केले असल्याचे म्हणाले.