उरण : जेएनपीटी बंदर आणि उरणसह नवी मुंबईतील विविध भागात पर्यावरणासह, जैवविविधतेचाही वेगाने ऱ्हास होत आहे. त्याला येथील जनता आणि अधिकारी यांच्याकडून होणारे सातत्याचे जणीवपूर्वक दुर्लक्ष कारणीभूत असल्याचा आरोप पर्यावरणवाद्यांनी केला आहे. महाराष्ट्र किनारपट्टी प्रभाग व्यवस्थापन प्राधिकरण (सीआरझेड) हे “पैसे वसूलीचे क्षेत्र (कॅश रियलायजेशन झोन)” बनवण्यापासून प्रतिबंध करण्याचीही मागणी पर्यावरणवाद्यांनी यावेळी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जी-२० उपक्रमाच्या सी-२० अंतर्गत शनिवारी आयोजित केलेल्या परिषदेमध्ये या भागातील पर्यावरणप्रेमी सहभागी झाले होते. पर्यावरणवाद्यांनी “जनतेची उदासीनता आणि अधिका-यांचे दुर्लक्ष एकत्रितपणे –हासासाठी कारणीभूत असल्याचा” मुद्दा प्रकर्षाने पुढे आणला. तसेच सीआरझेड क्षेत्राचा संचरनात्मक प्रकल्पाच्या नावाने व्यावसायिक दुरुपयोग करण्याबद्दल पर्यावरणवाद्यांनी नाराजी व्यक्त केली. स्वामी विवेकानंद केंद्र, नवी मुंबई आयोजित कार्यक्रमात ’वैविध्य, समावेशकता आणि परस्परांप्रति आदर’ हा विषय होता. नॅटकनेक्ट फाउंडेशनने या विषयावर जैवविविधता, समाजाचा समावेश नसलेल्या पर्यावरण धोरणांमधल्या त्रुटी दाखवून दिल्या. संस्थेने शासन आणि जनतेला पर्यावरणाविषयी आदर राखण्याची विनंती देखील करण्यात आली.

हेही वाचा… चार लाख प्रवासी हाताळणारे उरण एसटी स्थानक पाण्याविना, उन्हाच्या तडाख्यात पाण्यासाठी प्रवाशांची तडफड

हेही वाचा… नवी मुंबई: एमआयडीसीतील अनावश्यक वृक्ष तोडीला बसणार चाप; वनविभागाच्या ना हरकतीनंतरच मिळणार मंजुरी

पाणथळ क्षेत्रे, कांदळवने, दलदलीचे भागातील डोंगराळ भागांच्या होणा-या –हासाकडे यावेळी लक्ष वेधून घेण्यात आले. त्यांनी शासकीय अधिका-यांची निष्क्रियता या सर्वांसाठी जवाबदार असल्याची जोरदार टिका नॅटकनेक्टचे संचालक बी.एन.कुमार यांनी केली. उच्च न्यायालयाद्वारे नियुक्त केलेल्या कांदळवन आणि पाणथळ क्षेत्र समितीने पाहणी करुन देखील उरण, खारघर, उलवे, वाशी आणि मानखूर्द येथील वारंवार घडत असलेल्या विनाशाच्या कृतींवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. उरणच्या तीन महत्वाच्या पाणथळ क्षेत्रांवर भराव घालण्यात आला आहे आणि नेरुळ येथील दोन पाणथळ क्षेत्रांवर देखील गोल्फ कोर्ससाठी विनाशाची टांगती तलवार असल्याची माहिती कुमार यांनी दिली.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Major biodiversity loss in navi mumbai area including jnpt uran asj
First published on: 29-05-2023 at 14:13 IST