बलात्कार प्रकरणातील आरोपीला जन्मठेप

आठ वर्षीय पीडिता ही घरात एकटी असताना ३१ ऑगस्ट २०१७ रोजी तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला.

jail-2
प्रतिनिधिक छायाचित्र

पनवेल : पाच वर्षांपूर्वी खारघर येथे आठ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा जीव घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला आजीवन कारावास आणि २२ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा झाली आहे. खारघर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ओवे गावात राहणारी आठ वर्षीय पीडिता ही घरात एकटी असताना ३१ ऑगस्ट २०१७ रोजी तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. ती ओरडू लागल्याने तिचा गळा आवळून ती बेशुद्ध झाल्यावर तिच्यावर बलात्कार करून आरोपी जान अन्वर आलम हा तेथून फरार झाला होता. खेळण्यासाठी घराबाहेर गेलेला पीडितेचा भाऊ घरी परतल्यानंतर बहीण बेशुद्धावस्थेत पडल्याचे पाहून त्याने शेजाऱ्यांना मदतीसाठी बोलावले. शेजारच्या महिलेने पीडितेच्या आईला फोन करून घरी बोलावून घेतले. तिची आई घरी आल्यावर मुलीने घडलेला सर्व प्रकार सांगितल्यावर तिच्या आईने खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. हे प्रकरण पनवेल येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात सुरू होते. पनवेल सत्र न्यायालयात सोमवारी या प्रकरणाच्या झालेल्या सुनावणीत न्यायाधीश माधुरी आनंद यांनी दिलेल्या आदेशात आरोपी जान आलम यास आजन्म तुरुंगवासाची शिक्षा आणि २२ हजार रुपये दंड ठोठावला आहे.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Man gets life imprisonment for minor girl s rape zws

Next Story
उरणमध्ये मोसमीपूर्व पावसाच्या सरी
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी